TRENDING:

Rohit Sharma : पहिलीच मॅच आणि पहिलंच बक्षीस, रोहितला मिळालेली रक्कम पाहून धक्काच बसेल

Last Updated:
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबईने 8 विकेट राखून सिक्कीमचा पराभव केला आहे. मुंबईच्या या विजयात रोहित शर्माने 155 धावांची वादळी खेळी करून मोठा वाटा उचलला होता.
advertisement
1/7
पहिलीच मॅच आणि पहिलंच बक्षीस, रोहितला मिळालेली रक्कम पाहून धक्काच बसेल
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबईने 8 विकेट राखून सिक्कीमचा पराभव केला आहे. मुंबईच्या या विजयात रोहित शर्माने 155 धावांची वादळी खेळी करून मोठा वाटा उचलला होता.
advertisement
2/7
खरं तर मुंबईकडून खेळताना टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने 94 बॉलमध्ये 155 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळी दरम्यान रोहितने 9 षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 164 होता.
advertisement
3/7
रोहितने अशाप्रकारे ही वादळी खेळी करून 30 ओव्हरमध्येच मॅच संपवली आहे. त्यामुळे मुंबईने सिक्कीमवर दणदणीत विजय मिळवला.
advertisement
4/7
खरं तर सिक्कीमने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 236 धावा ठोकल्या होत्या. सिक्कीमकडून आशिष थापाने 79 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. मुंबईकडून यावेळी कर्णधार शार्दुल ठाकूर 2, तुषार देशपांडे, तनुश कोटीयन, शम्स मुलानी आणि मुशीर खानने प्रत्येकी 1 विकेट काढली आहे.
advertisement
5/7
या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने 155 धावांची दीड शतकीय खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने 30.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
advertisement
6/7
दरम्यान सिक्कीमकडून क्रांथी कुमार आणि अंकुर मलिकने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. हा सामना जिंकून मुंबईने चांगली सूरूवात केली आहे.
advertisement
7/7
रोहित शर्माच्या या खेळीनंतर त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारात त्याला 10 हजार रूपयाची रक्कम बक्षीस रूपात देण्यात आली आहे. ही रक्कम चाहत्यांना धक्का बसला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : पहिलीच मॅच आणि पहिलंच बक्षीस, रोहितला मिळालेली रक्कम पाहून धक्काच बसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल