TRENDING:

नवी मुंबईच्या आकाशात आजपर्यंत कधीच पाहिलं नाही असं दृश्य, विमानतळ परिसरात सगळेच भारावले PHOTOS

Last Updated:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आता २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी पूर्व संध्येला आकाशात एक भव्य 'ड्रोन शो' आयोजित करण्यात आला होता.
advertisement
1/8
नवी मुंबईच्या आकाशात आजपर्यंत कधीच पाहिलं नाही असं दृश्य, विमानतळ परिसरात सगळेच
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) आता २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी पूर्व संध्येला आकाशात एक भव्य 'ड्रोन शो' आयोजित करण्यात आला होता. तब्बल १,५१५ ड्रोननी एकाच वेळी अवकाशात झेप घेत विविध कलाकृती साकारल्या आणि उपस्थितांच्या डोळ्याची पारणं फेडली.
advertisement
2/8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला, विमानतळाच्या कार्यान्वयनाच्या शुभारंभानिमित्त 1,515 ड्रोनच्या नेत्रदीपक ड्रोन शोचे आयोजन करण्यात आलं.
advertisement
3/8
अत्यंत अचूक समन्वय साधत या ड्रोननी आकाशात 3D कमळाची फुले, कमळ डिझाइन इंटिरियर्स, विमानतळाचा लोगो, ग्रीन एअरपोर्ट, मुंबईच्या आकाशात उडणारे विमान आणि ‘राईज ऑफ इंडिया’ अशा आकर्षक आकृती साकारल्या.
advertisement
4/8
तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे रात्रीचे आकाश जणू एक भव्य कॅनव्हास बनले होते.
advertisement
5/8
विमानतळाच्या भव्यतेच, आधुनिकतेच दर्शन या सोहळ्यातून पाहण्यास मिळालं. या कार्यक्रमाला दिव्यांग व्यक्ती, युवा खेळाडू आणि NMIAचे कर्मचारी उपस्थित होते.
advertisement
6/8
सर्वांसाठी खुल्या असलेल्या या कार्यक्रमात हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या कर्मचाऱ्यांना मिळाली.
advertisement
7/8
विमानतळाची रचना भारताचे राष्ट्रीय फूल 'कमळ' या संकल्पनेवर आधारित आहे. हे एक 'ग्रीनफिल्ड' विमानतळ असून येथे अक्षय ऊर्जा आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.
advertisement
8/8
या खास सोहळ्यासाठी दिव्यांग व्यक्ती, तरुण खेळाडू आणि विमानतळ प्रकल्पातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
नवी मुंबईच्या आकाशात आजपर्यंत कधीच पाहिलं नाही असं दृश्य, विमानतळ परिसरात सगळेच भारावले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल