TRENDING:

50 पट ॲक्शन अन् सस्पेन्स, 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर पार्ट 2 बद्दल मोठी अपडेट, प्रेक्षकांसाठी मेकर्सचं खास सरप्राइज!

Last Updated:
Dhurandhar 2: रणवीर सिंगच्या या चित्रपटाने केवळ चित्रपटगृहात गर्दीच खेचली नाही, तर कमाईचे असे काही रेकॉर्ड बनवले आहेत की, बॉलिवूडमधील मोठमोठे दिग्गजही थक्क झालेत.
advertisement
1/8
50 पट ॲक्शन अन् सस्पेन्स, 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर पार्ट 2 बद्दल मोठी अपडेट
मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या एकाच नावाचा दरारा पाहायला मिळतोय, तो म्हणजे 'धुरंधर'! रणवीर सिंगच्या या चित्रपटाने केवळ चित्रपटगृहात गर्दीच खेचली नाही, तर कमाईचे असे काही रेकॉर्ड बनवले आहेत की, बॉलिवूडमधील मोठमोठे दिग्गजही थक्क झालेत.
advertisement
2/8
पण आता खरी मोठी बातमी समोर आली आहे. 'धुरंधर'च्या पहिल्या भागाने फक्त हिंदीत येऊन धिंगाणा घातला होता, पण त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'धुरंधर २' आता चक्क ५ भाषांमध्ये रिलीज होऊन अख्खा भारत काबीज करायला सज्ज झाला आहे.
advertisement
3/8
बुधवारी निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत चाहत्यांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी, म्हणजेच ईदच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर धडकणार आहे.
advertisement
4/8
विशेष म्हणजे, 'धुरंधर'चा पहिला भाग फक्त हिंदी भाषेत प्रदर्शित झाला होता. तरीही, साऊथ इंडियामध्ये या सिनेमाची इतकी क्रेझ पाहायला मिळाली की, तिथल्या प्रेक्षकांनी आणि वितरकांनी चक्क निर्मात्यांकडे दाद मागितली होती. "आम्हाला हा सिनेमा आमच्या भाषेत पाहायचा आहे," अशी मागणी दाक्षिणात्य राज्यांतून जोर धरत होती.
advertisement
5/8
प्रेक्षकांचा हाच उत्साह पाहून दिग्दर्शक आदित्य धर आणि जिओ स्टुडिओजने मोठा निर्णय घेतला आहे. आता 'धुरंधर २' एकाच वेळी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होईल. म्हणजेच, आता 'धुरंधर' खऱ्या अर्थाने पॅन-इंडिया ब्लॉकबस्टर होण्याच्या मार्गावर आहे.
advertisement
6/8
२०२६ ची ईद चित्रपटसृष्टीसाठी खूपच धमाकेदार असणार आहे. कारण, रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' समोर साऊथचे दोन दिग्गज उभे ठाकले आहेत. 'केजीएफ' फेम यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक' आणि अदिवी शेषचा 'डकैत' हे दोन्ही सिनेमे त्याच दिवशी रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणाचं नाणं चालणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
advertisement
7/8
'धुरंधर'ने एक अजब विक्रम आपल्या नावे केला आहे. सलग १७ दिवस दररोज २० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. आश्चर्य म्हणजे, हे यश 'दंगल' किंवा 'RRR' सारख्या ऐतिहासिक चित्रपटांनाही मिळवता आलं नव्हतं.
advertisement
8/8
सध्या हा चित्रपट ९०० कोटींच्या आकड्याला स्पर्श करण्याच्या बेतात असून, चौथ्या आठवड्यातही थिएटर्समध्ये प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिक्वेल आता कोणत्या थराला जातो आणि रणवीर सिंगचा 'धुरंधर' अवतार साऊथच्या सुपरस्टार्सना कशी टक्कर देतो, हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
50 पट ॲक्शन अन् सस्पेन्स, 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर पार्ट 2 बद्दल मोठी अपडेट, प्रेक्षकांसाठी मेकर्सचं खास सरप्राइज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल