Dhurandhar 2 मधून 'या' अभिनेत्यांचा पत्ता कट! जुन्या कलाकारांना का वगळलं? समोर आलं कारण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2: सिक्वेलमध्ये नवे चेहरे येणं स्वाभाविक असलं, तरी जुन्या कलाकारांना का वगळलं? याचं कारण आता समोर आलं आहे.
advertisement
1/10

मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या एकाच नावाचा धुराळा पाहायला मिळतोय, तो म्हणजे 'धुरंधर'! रणवीर सिंगच्या या स्पाई थ्रिलरने केवळ १८ दिवसांत तब्बल ८७० कोटींची कमाई करून जगभरातील सिनेरसिकांना वेड लावलं आहे.
advertisement
2/10
भारतासोबतच पाकिस्तानातही या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळतेय. पण, या जबरदस्त यशाच्या जल्लोषात एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडू शकतं.
advertisement
3/10
'धुरंधर'च्या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा झाली असून, १९ मार्च २०२६ ही तारीखही लॉक करण्यात आली आहे. मात्र, या सिक्वेलमध्ये पहिल्या भागातील सर्वात गाजलेला चेहरा म्हणजेच अक्षय खन्ना दिसणार नाहीये. केवळ अक्षयच नाही, तर ५ महत्त्वाच्या कलाकारांचा या चित्रपटातून पत्ता कट झाला आहे.
advertisement
4/10
सिक्वेलमध्ये नवे चेहरे येणं स्वाभाविक असलं, तरी जुन्या कलाकारांना का वगळलं? याचं कारण मानधन किंवा वाद नसून, चित्रपटाची कथा आहे. पहिल्या भागाच्या क्लायमॅक्समध्ये या पाचही पात्रांचा अंत झाला आहे. पाहा नक्की कोणाची एक्झिट झाली आहे.
advertisement
5/10
अक्षय खन्ना (रहमान डकैत): ज्या पात्राने प्रेक्षकांना सर्वात जास्त खिळवून ठेवलं, तो म्हणजे 'रहमान डकैत'. अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स आणि डायलॉग्सने सोशल मीडिया गाजवलं. पण कथेनुसार, रहमानचा पहिल्या भागात मृत्यू झाला आहे, त्यामुळे सिक्वेलमध्ये तो पुन्हा दिसण्याची शक्यता नाही.
advertisement
6/10
नवीन कौशिक (डोंगा): रहमानचा उजवा हात आणि रणवीरच्या 'हमजा' पात्राचा जवळचा मित्र म्हणजे 'डोंगा'. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात डोंगा जखमी होऊन मृत्युमुखी पडतो. त्यामुळे त्याची ही कथा इथेच संपली आहे.
advertisement
7/10
रहुल्लाह गाझी (स्याही): रहमानच्या टोळीतील सर्वात आक्रमक सदस्य म्हणजे 'स्याही'. क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंगसोबत (हमजा) झालेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या फायटिंगमध्ये स्याहीचा अंत होतो.
advertisement
8/10
हितुल पुजारा (नईम बलोच): रहमान डकैतचा मोठा मुलगा 'नईम' याच्या मृत्यूनेच चित्रपटातील संघर्षाला खरी धार आली होती. एका लग्नात झालेल्या हल्ल्यात नईमचा बळी जातो आणि रहमानच्या कुटुंबात सूडाची आग पेटते.
advertisement
9/10
आसिफ अली हैदर खान (बाबू डकैत): रहमान डकैतचे वडील 'बाबू डकैत' यांची हत्या खुद्द रहमानच दगडाने ठेचून करतो. आपल्या मुलाच्या हत्येला स्वतःचे वडीलच जबाबदार आहेत, हे समजल्यानंतर रहमान हा क्रूर निर्णय घेतो.
advertisement
10/10
आसिफ अली हैदर खान (बाबू डकैत): रहमान डकैतचे वडील 'बाबू डकैत' यांची हत्या खुद्द रहमानच दगडाने ठेचून करतो. आपल्या मुलाच्या हत्येला स्वतःचे वडीलच जबाबदार आहेत, हे समजल्यानंतर रहमान हा क्रूर निर्णय घेतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 मधून 'या' अभिनेत्यांचा पत्ता कट! जुन्या कलाकारांना का वगळलं? समोर आलं कारण