चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर गर्दी, आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलं खंडोबा मंदिर
- Published by:News18 Marathi
Last Updated:
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गड व खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
advertisement
1/7

जेजुरी येथे चंपाष्टमी षडरात्र उत्सवाला अतिशय धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. आज चंपाषष्ठी उत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
advertisement
2/7
करवीरपीठाचे आद्य शंकराचार्य गुरुवर्य नृसिंह भारती व श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त,पुजारी सेवकवर्ग यांच्या हस्ते कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी करून श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली होती.
advertisement
3/7
चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गड व खंडोबा मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडाचं देखणं रूप भाविकांना आकर्षित करतंय.
advertisement
4/7
महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात. या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे.
advertisement
5/7
पौराणिक काळात भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेवून मनी आणि मल्ल या असुरांशी युद्ध करून विजय मिळवला व खंडोबाचा अवतार घेतला, अशी कथा सांगितली जाते.
advertisement
6/7
मनी आणि मल्ल असुरांवरील या विजयाचे प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदे पासून सहा दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो. या उत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर दाखल होत असतात.
advertisement
7/7
दररोज त्रिकाळ आरती, महापूजा, महाआरती, वाघ्या मुरुळींचे जागरण गोंधळ, महाप्रसाद अशा विविध उपक्रमांचे जेजुरी गडावर आयोजन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
चंपाषष्ठी उत्सवाला जेजुरी गडावर गर्दी, आकर्षक विद्युत रोषणाईनं सजलं खंडोबा मंदिर