TRENDING:

नदीच्या पात्रातील या मंदिरात श्रावणात असते मोठी गर्दी, घरबसल्या घ्या दर्शन

Last Updated:
हे मंदिर नदीच्या पात्रात आहे. ग्रामदैवत असल्यामुळे या ठिकाणी श्रावणात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
advertisement
1/5
नदीच्या पात्रातील या मंदिरात श्रावणात असते मोठी गर्दी, घरबसल्या घ्या दर्शन
श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. या पवित्र महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते असे म्हणतात. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांची भगवान शंकराची पूजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यातून सिंदफणा नदी वाहते. या नदीच्या पात्रात माजगाव येथे सिद्धश्वेर मंदिर आहे. अशा प्रकारे नदीपात्रात क्वचितच मंदिरे आढळतात. त्यामुळे या मंदिराला वेगळे महत्त्व आहे. सिद्धेश्वर मंदिर हे माजलगाव वासियांचे ग्रामदैवत आहे. त्यामुळे या ठिकाणी श्रावणात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
advertisement
3/5
श्रावण महिन्यात या ठिकाणी महापूजाचे आयोजन केल्या जाते. सकाळी आणि सायंकाळीच्या सुमारास महाआरतीचे या ठिकाणी आयोजन केले जाते. संपूर्ण मंदिराला दरवेळेस वेगवेगळ्या पद्धतीच्या फुलांची सजावट केली जाते.
advertisement
4/5
या मंदिराची जडणघडण पेशवेकालीन आहे. चार फूट रुंद भिंती असून निसर्गातील सर्व वातावरणाशी लढण्याची या मंदिराची क्षमता आहे. या मंदिरात अनेक संत वास्तव्यास असल्याचे देखील सांगण्यात येते. सिंदफणा नदीच्या पात्रात माजलगाव या धरणातून पाणी सोडले जाते.
advertisement
5/5
तेव्हा अनेकदा हे मंदिर या पुराच्या पाण्यामध्ये कित्येक दिवस पाण्याखाली देखील राहिले आहे. मात्र मंदिराची जडणघडण ही जुन्या पद्धतीने असल्यामुळे आतापर्यंत मंदिराचे काहीही नुकसान झाले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
नदीच्या पात्रातील या मंदिरात श्रावणात असते मोठी गर्दी, घरबसल्या घ्या दर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल