Vastu Tips: सूर्यास्तानंतर केलेल्या या 7 गोष्टींमुळे वाढतं दारिद्र्य; आर्थिक घडी विस्कटण्याची प्रमुख कारणे
- Written by:Prachi Dhole
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: खूप प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर काही धार्मिक उपाय जरूर करून पाहावेत. धार्मिक मान्यतांनुसार, हे उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पैशांची उणीव भासणार नाही. गरिबीपासून दूर राहण्यासाठी या 7 गोष्टींपासून नेहमी दूर राहिले पाहिजे, अशी मान्यता आहे.
advertisement
1/7

उंबरठा - सूर्यास्ताच्या वेळी घराच्या किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर उभे राहून बोलू नका. तसेच व्यवहारांबद्दल बोलू नका.
advertisement
2/7
दान करणे टाळा - सूर्यास्ताच्या वेळी कोणालाही दान देऊ नका, ते कितीही महत्त्वाचे असले तरीही देऊ नका, असे शास्त्र सांगते. या काळात दुध, दही, तूप, रुपये इतरांना दान करू नका.
advertisement
3/7
शारीरिक संबंध टाळा - सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही शारीरिक संबंध प्रस्थापित करू नयेत. या काळाला गो धुली बेला म्हणतात. पूजा करण्याची किंवा दिवा लावण्याची ही वेळ आहे.
advertisement
4/7
केस धुवू नका किंवा मेकअप करू नका - सूर्यास्ताच्या वेळी कितीही महत्त्वाचे असले तरी महिलांनी केस धुवू नयेत किंवा स्वत:ला सजवू नये. शक्य असल्यास पूजेत वेळ घालवावा, अशी मान्यता आहे.
advertisement
5/7
कपडे धुवू नये - सूर्यास्तानंतर कपडे कधीही धुवू नयेत. काही अडचणींमुळे ते धुवावे लागलेच तरी चुकूनही बाहेर वाळवू नका.
advertisement
6/7
अंघोळ, झाडू मारणे, अंत्यसंस्कार वर्ज्य : सूर्यास्तानंतर अंघोळ, झाडणे, अंत्यसंस्कार करण्यास मनाई आहे. त्याचा उल्लेख पुराणात आढळतो. या वेळी झाडांना स्पर्शही करू नये.
advertisement
7/7
रात्री केस कापणे, मुंडण करणे अशुभ: धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी केस कापणे किंवा मुंडण करणे कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ नाही. असे केल्याने व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जा प्रभावी होते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला गरिबीचाही सामना करावा लागू शकतो, अशीही धार्मिक मान्यता आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Vastu Tips: सूर्यास्तानंतर केलेल्या या 7 गोष्टींमुळे वाढतं दारिद्र्य; आर्थिक घडी विस्कटण्याची प्रमुख कारणे