कितीही मेहनत केली तरी टिकत नाही पैसा, नेहमीच भासते आर्थिक चणचण? 'हे' उपाय ठरतील रामबाण!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अनेकदा आपण पाहतो की, काही लोक रात्रंदिवस मेहनत करतात, चांगले उत्पन्नही मिळवतात, पण महिना अखेरीस त्यांच्या हातात काहीच उरत नाही. पैसा येतो पण तो औषधोपचार, अनावश्यक खर्च किंवा अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे खर्च होऊन जातो.
advertisement
1/7

अनेकदा आपण पाहतो की, काही लोक रात्रंदिवस मेहनत करतात, चांगले उत्पन्नही मिळवतात, पण महिना अखेरीस त्यांच्या हातात काहीच उरत नाही. पैसा येतो पण तो औषधोपचार, अनावश्यक खर्च किंवा अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे खर्च होऊन जातो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते किंवा कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल नसते, तेव्हा लक्ष्मी घरात टिकत नाही.
advertisement
2/7
तिजोरीची दिशा आणि स्थान: वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे तुमची तिजोरी किंवा पैसे ठेवण्याचे कपाट नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे. तिजोरी अशा प्रकारे ठेवा की ती उघडताना तिचे तोंड उत्तर दिशेला असेल. यामुळे धनाचा ओघ वाढतो.
advertisement
3/7
मिठाच्या पाण्याचा वापर: घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी रोज सकाळी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते. घर स्वच्छ आणि वास्तुदोषमुक्त राहिल्याने लक्ष्मीचे आगमन होते.
advertisement
4/7
तुळशीपाशी दिवा लावणे: दररोज संध्याकाळी तुळशीच्या झाडापाशी शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तुळस हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात दररोज सायंकाळी तुळशीची पूजा होते, तिथे दरिद्रता कधीच राहत नाही. दिवा लावताना 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.
advertisement
5/7
पाण्याचे नळ दुरुस्त करा: घरातील कोणत्याही नळातून पाणी टपकत असेल, तर ते आर्थिक नुकसानाचे मोठे कारण ठरते. वास्तूनुसार, पाण्याचे टपकणे हे पैशांच्या अपव्ययाचे प्रतीक आहे. त्यामुळे घरातील गळके नळ त्वरित दुरुस्त करावेत.
advertisement
6/7
शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा: शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवशी घराच्या देव्हाऱ्यात 'श्रीयंत्राची' स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. श्रीयंत्राला गुलाबाचे फूल आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. यामुळे अडकलेले पैसे मिळण्यास मदत होते.
advertisement
7/7
अन्नाचा आदर आणि दान: ज्या घरात अन्नाचा अपमान होतो किंवा कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो, तिथे लक्ष्मी वास करत नाही. नेहमी रात्रीची भांडी स्वच्छ करून झोपावे. तसेच, आपल्या उत्पन्नातील काही छोटा हिस्सा गरिबांना किंवा मुक्या प्राण्यांना अन्न देण्यासाठी वापरावा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
कितीही मेहनत केली तरी टिकत नाही पैसा, नेहमीच भासते आर्थिक चणचण? 'हे' उपाय ठरतील रामबाण!