4 राशींवर येणार संक्रांत? जेव्हा शनीच्या राशीत जाईल सूर्य तेव्हा होऊ शकते मोठी उलथापालथ!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Makar Sankranti 2025 Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य ग्रहाचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा 'मकर संक्रांत' साजरी होते. तसंच जेव्हा एखाद्या ग्रहाचा राशीप्रवेश होतो तेव्हा त्याचा सकारात्मक, नकारात्मक प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. त्याप्रमाणेच सूर्याच्या मकरप्रवेशातून काही राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघेल, तर काही राशींच्या व्यक्तींना मात्र त्रास सोसावा लागण्याची शक्यता आहे. या व्यक्तींनी घाबरून जाऊ नये, परंतु काळजी घ्यायला हवी, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. (ओम प्रयास, प्रतिनिधी / हरिद्वार)
advertisement
1/7

कुंभ : या राशीच्या व्यक्तींवर सूर्याच्या मकरप्रवेशाचा नकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. कामकाजात नुकसान होऊ शकतं, आर्थिक स्थिती कोलमडू शकते. संसारात अडचणी येऊ शकतात. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. याबाबत काळजी घ्यावी.
advertisement
2/7
सिंह : सूर्याच्या मकर प्रवेशामुळे या राशीच्या व्यक्तींचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्यावं. काळजी घ्यावी.
advertisement
3/7
कन्या : सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर या राशीच्या व्यक्तींच्या कुटुंबात वाद होऊ शकतात. त्यामुळे घरातलं वातावरण जास्तीत जास्त शांत कसं राहिल याची काळजी घ्यावी.
advertisement
4/7
मिथुन : सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताच या राशीच्या व्यक्तींसाठी काळ नुकसानदायी असू शकतो. कामकाजात नुकसान होऊ शकतं. नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.
advertisement
5/7
हरिद्वारमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित शशांक शेखर शर्मा यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सूर्य आणि शनी ग्रहांमध्ये पिता-पुत्राचं नातं मानलं जातं. मकर ही शनीची रास आहे. त्यामुळे सूर्याचा प्रवेश शनीच्या राशीत होणार आहे.
advertisement
6/7
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 12 महिन्यांनी सूर्याचा शनीच्या राशीत प्रवेश होणार आहे. 14 जानेवारीला सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
4 राशींवर येणार संक्रांत? जेव्हा शनीच्या राशीत जाईल सूर्य तेव्हा होऊ शकते मोठी उलथापालथ!