घरात मुलगा नसून मुलगी आहे मग अशावेळेस पितृपक्षात पुर्वजांचे श्राद्ध कोणी घालायचे? श्राद्धपक्षाचे नियम काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मात पितृपक्षाला (श्राद्ध पक्ष) अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर पंधरा दिवस हा कालावधी पूर्वजांच्या स्मरणासाठी पाळला जातो. या दिवसांत पितरांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधी अर्पण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.
advertisement
1/6

हिंदू धर्मात पितृपक्षाला (श्राद्ध पक्ष) अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. दरवर्षी भाद्रपद पौर्णिमेनंतर पंधरा दिवस हा कालावधी पूर्वजांच्या स्मरणासाठी पाळला जातो. या दिवसांत पितरांना तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध विधी अर्पण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते. परंपरेनुसार हे विधी मुलाने करणं अपेक्षित मानलं गेलं आहे. मात्र, बदलत्या काळात आणि कुटुंबातील बदलत्या परिस्थितीत अनेकदा मुलगा नसून फक्त मुलगी असते. अशा वेळी श्राद्ध कोणी करायचे, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.
advertisement
2/6
शास्त्रातील दृष्टिकोन धार्मिक ग्रंथांमध्ये पुत्राला श्राद्धाचे महत्त्व दिले गेले असले तरी मुलगा नसल्यास मुलगी किंवा पत्नीही हे विधी करू शकतात, असा उल्लेख आढळतो. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धा सर्वात महत्त्वाची असल्याचे अनेक शास्त्रकार मान्य करतात.
advertisement
3/6
<strong>रामायणातील उदाहरण -</strong> वाल्मिकी रामायणात यासंबंधी स्पष्ट उदाहरण सापडते. वनवासात असताना भगवान राम आणि लक्ष्मण साहित्य आणण्यासाठी गेले असता श्राद्धाची वेळ निघून जात होती. त्या वेळी माता सीतेला राजा दशरथाचे दर्शन झाले आणि त्यांच्या आत्म्याच्या सांगण्यावरून सीतेने फाल्गु नदीच्या तीरावर केवळ पान, फुले आणि गाईच्या साक्षीने पिंडदान केले. या कृतीमुळे दशरथांच्या आत्म्याला शांती लाभली, असे उल्लेख रामायणात आहेत. यावरून स्त्रीही श्राद्ध करण्यास पात्र आहे हे दिसून येते.
advertisement
4/6
<strong>गरुड पुराणातील उल्लेख -</strong> गरुड पुराणात देखील मुलगा नसल्यास सून, पत्नी किंवा मुलगी श्राद्ध करू शकते, असे सांगितले आहे. श्लोकांमध्ये नमूद आहे की ज्येष्ठ वा कनिष्ठ पुत्र नसेल तर पत्नी, सून किंवा मोठी मुलगी श्राद्ध करण्यास पात्र ठरते. जर घरातील महिला नसतील तर नातलग, पुतणे, नातू, शिष्य किंवा जवळचा ब्राह्मण श्राद्ध करू शकतो.
advertisement
5/6
<strong>महिलांना श्राद्धाचा अधिकार - </strong>धर्मशास्त्रात मुलगा, नातू किंवा पणतू नसल्यास विधवा महिलेला पिंडदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचप्रमाणे मुलगीही आई-वडिलांचे श्राद्ध करू शकते. यामागे मूलभूत तत्त्व हेच आहे की, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जो कोणी श्रद्धेने अर्पण करेल त्याचे श्राद्ध ग्राह्य धरले जाते.
advertisement
6/6
<strong>विधी करताना घ्यावयाची काळजी - </strong> जर महिला श्राद्ध करत असतील तर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. त्या दिवशी साधे पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करणे उचित मानले जाते. तर्पण करताना काळे तीळ टाळावेत आणि साध्या कुश व जलाचा वापर करावा. श्राद्ध साधेपणाने, पण श्रद्धेने केले की त्याचे फळ पितरांपर्यंत पोहोचते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
घरात मुलगा नसून मुलगी आहे मग अशावेळेस पितृपक्षात पुर्वजांचे श्राद्ध कोणी घालायचे? श्राद्धपक्षाचे नियम काय?