Ravan : रावण कोणाचा अवतार होता? दसऱ्याला राक्षस म्हणून दहन करतो, पण ही गोष्ट अनेकांना माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आपल्याला माहीतच आहे, भगवान राम हे विष्णूंचे अवतार आहेत आणि माता सीता या लक्ष्मीच्या अवतार मानल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की रावण आणि कुंभकर्ण यांचं खरं रहस्य काय आहे? ते फक्त राक्षस होते का? की त्यामागे अजून काही गूढ कथा दडलेली आहे?
advertisement
1/10

आपण लहानपणापासून रामायण आणि महाभारत याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. या ग्रंथांमध्ये केवळ वीरता आणि युद्ध नाही, तर त्यात अध्यात्म, धर्म आणि गूढ रहस्यंही दडलेली आहेत. देवांचे अवतार, राक्षसांचे शाप, ऋषींचे आशीर्वाद हे सगळं आपण कथा-कहाण्यांमधून अनुभवतो.
advertisement
2/10
आपल्याला माहीतच आहे, भगवान राम हे विष्णूंचे अवतार आहेत आणि माता सीता या लक्ष्मीच्या अवतार मानल्या जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की रावण आणि कुंभकर्ण यांचं खरं रहस्य काय आहे? ते फक्त राक्षस होते का? की त्यामागे अजून काही गूढ कथा दडलेली आहे?
advertisement
3/10
दसऱ्याला भारतात अनेक ठिकाणी रावणाचं दहन केलं जातं. रावणाला लोक जाळतात. कारण या दिवशी रामाने-रावणाचा वध केला होता. त्यामुळे रावणाला जाळून आपण वाईट गोष्टींचा नाश करतोय किंवा वध करतोय अशी मान्यता लोकांमध्ये आहे. पण तुम्हाला माहितीय का की रावण आणि कुंभकरण कोणाचा आवतार आहे?
advertisement
4/10
पुराणांनुसार, वैकुंठात भगवान विष्णूंचे दोन द्वारपाल होते. ज्यांची नावं होती जय आणि विजय. हे दोघं अतिशय पराक्रमी आणि बलशाली होते. एकदा काही ऋषींनी वैकुंठात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण जय-विजयांनी त्यांना थांबवलं. यामुळे ते ऋषी संतापले आणि त्यांनी जय-विजयांना शाप दिला की, तुम्हाला मर्त्यूलोकात जन्म घ्यावा लागेल आणि पृथ्वीवर राक्षस म्हणून यावं लागेल.
advertisement
5/10
हा शाप ऐकून जय-विजय व्याकूळ झाले. ते भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी क्षमा मागितली. त्यांनी विष्णूला हे देखील सांगितलं की आम्ही आमच्या कर्तव्याचं पालन केलं, त्यामुळे आम्हाला माफी मिळावी. त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितलं, “तुम्हाला पृथ्वीवर तीन जन्म घ्यावे लागतील. पण त्या प्रत्येक जन्मात माझ्याशी तुमचं युद्ध होईल आणि तुम्हाला माझ्या हातून पराभूत व्हावं लागेल.” त्यावेळी भगवान विष्णूकडून आपल्याला मृत्यू प्राप्त होईल हे ऐकल्यावर आपलं आयुष्य धन्य झालं असं जय-विजय यांनी मान्य केलं आणि हसत हसत तो श्राप स्वीकारला.
advertisement
6/10
पहिला जन्म – हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूशापानुसार जय-विजय यांनी पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू या दोन असुर रुपात जन्म घेतला. भगवान विष्णूनी वराहावतार आणि नृसिंहावतार धारण करून त्यांचा संहार केला.
advertisement
7/10
दुसरा जन्म - रावण आणि कुंभकर्णयानंतर दुसऱ्या जन्मात हेच जय-विजय रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आले. रावण विद्वान, पराक्रमी आणि महाशक्तिशाली होता, तर कुंभकर्ण अतुलनीय बलाढ्य. पण त्यांच्या अहंकारामुळे आणि कर्मामुळे त्यांचा विनाश निश्चित झाला. भगवान विष्णूंनी रामावतार घेऊन या दोघांचा पराभव केला.
advertisement
8/10
तिसरा जन्म - शिशुपाल आणि दंतवक्रशापाचा तिसरा भाग पूर्ण करण्यासाठी जय-विजय यांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून झाला. यांचा पराभव भगवान श्रीकृष्णांनी केला. त्यानंतर त्यांचा शाप संपला आणि ते पुन्हा वैकुंठाला परत गेले.
advertisement
9/10
रावण - फक्त राक्षस नव्हता!यावरून हे स्पष्ट होतं की रावण आणि कुंभकर्ण हे केवळ राक्षस नव्हते, तर भगवान विष्णूंचेच परम सेवक होते. शापामुळे त्यांना पृथ्वीवर येऊन आपली भूमिका बजवावी लागली. त्यांचा उद्देश रामावताराचं कारण निर्माण करणं हा होता.
advertisement
10/10
म्हणूनच आजही रामायणातील या पात्रांचा अभ्यास केल्यावर कळतं, की चांगलं-वाईट, देव-दानव यामागे केवळ युद्ध नाही तर एक गहन आध्यात्मिक संदेशही दडलेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ravan : रावण कोणाचा अवतार होता? दसऱ्याला राक्षस म्हणून दहन करतो, पण ही गोष्ट अनेकांना माहितच नाही