TRENDING:

Asia Cup फायनल आधी युवा खेळाडूला लॉटरी, टीम इंडियात मिळणार बढती? कोण आहे खेळाडू?

Last Updated:
टीम इंडियाच्या एका खेळाडूची लॉटरी लागली आहे. या खेळाडूला टीम इंडियात थेट बढती मिळणार आहे.त्यामुळे या खेळाडूची चर्चा आहे.
advertisement
1/7
Asia Cup फायनल आधी युवा खेळाडूला लॉटरी, टीम इंडियात मिळणार बढती? कोण आहे खेळाडू?
आशिया कपच्या सूपर 4 मध्ये आज भारत आणि बांग्लादेश हे दोन संघ आमने आज सामने येणार आहेत. या सामन्याला आठ वाजता सूरू होणार आहे.फायनलच्या दृष्टीने हा महत्वाचा सामना असणार आहे. कारण जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे.
advertisement
2/7
या सामन्याआधीच टीम इंडियाच्या एका खेळाडूची लॉटरी लागली आहे. या खेळाडूला टीम इंडियात थेट बढती मिळणार आहे.त्यामुळे या खेळाडूची चर्चा आहे.
advertisement
3/7
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा हा खेळाडू सध्या धावांचा पाऊस पाडतो आहे. त्याच्या या बॅटीतून येणाऱ्या धावांमुळे टीम इंडियाने आतापर्यंत आशिया कपमध्ये एकही सामना गमावला आहे.त्यामुळे त्याला या कामगिरीच फळ मिळालं आहे.
advertisement
4/7
टीम इंडियाचा युवा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माला संघात बढती मिळणार आहे. अभिषेकला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करते आहे. असे जर झाल्यास टी20 पुरता सीमित असणार अभिषेक वनडेतही खेळताना दिसणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
advertisement
5/7
अभिषेक शर्मा आशिया कपमधील 4 सामन्यांमध्ये 173 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वात प्रभावी भाग म्हणजे दुबईच्या मंद खेळपट्टीवर त्याचा 208.43 चा स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
advertisement
6/7
अभिषेक शर्माची ही कामगिरी पाहता टीम मॅनेजमेंट त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेण्यास उत्सुक आहे.असे झाल्यास तो टीम इंडियाकडून वनडे सामनाही खेळताना दिसणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान भारत ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर पाच टी 20 सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Asia Cup फायनल आधी युवा खेळाडूला लॉटरी, टीम इंडियात मिळणार बढती? कोण आहे खेळाडू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल