IPL 2026 New Rule : ना रोहित-रितिका, ना विराट-अनुष्का, त्या कपड्यांवरही बंदी...BCCIची IPLसाठीची नवीन नियमावली काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीसीसीआयने आयपीएलआधीच स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. आणि जर नियमांच उल्लंघन केलं तर खेळाडूंवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
1/13

येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएल 2026 च्या हंगामाला सूरूवात होणार आहे. या लीगआधी बीसीसीआयने आयपीएलसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांचा खेळाडूंना मोठा झटका बसणार आहे.
advertisement
2/13
बीसीसीआयने आयपीएलआधीच स्पष्ट केले आहे की कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. आणि जर नियमांच उल्लंघन केलं तर खेळाडूंवर सक्त कारवाई करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
3/13
दरम्यान यंदाच्या हंगासामासाठी आयपीएलचे नवीन नियम काय आहेत? हे जाणून घेऊयात. खुल्या मैदानात प्रॅक्टीस करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याऐवजी फ्रेचायजींनी ट्रेनिंग सेशन नेट एरीयामध्ये करावेत,असे आदेश आहेत.
advertisement
4/13
एक टीम दुसऱ्या टीमला दिलेल्या पीचचा सरावासाठी वापर करू शकत नाही. जरी त्या टीमची प्रॅक्टीस सेशन लवकर संपलं तरी. विशेष म्हणजे मॅचच्या दिवशी फ्रेंचायजींना प्रॅक्टीस करता येणार नाही आहे. याआधी मुभा होती, पण आता मनाई करण्यात आली आहे.
advertisement
5/13
फ्रॅचायझींना बीसीसीआयच्या पूर्वपरवानगीने जास्तीत जास्त दोन सराव सामने खेळण्याची परवानगी आहे आणि हे सामने केवळ बाजूच्या खेळपट्ट्यावर खेळले पाहिजेत. जर हे सामने फ्लडलाइटसच्या प्रकाशात खेळले गेले तर त्यांचा कालावधी साडीतीन तासांपेक्षा जास्त नसावा.
advertisement
6/13
मॅचच्या दिवशी फिटनेस ड्रील किंवा यो यो टेस्ट करण्याची परवानगी नाही आहे. तसेच प्रॅक्टीस दरम्यान फक्त खेळाडूंना आणि अधिकृत सपोर्ट स्टाफलाच मैदानावर जाण्याची परवानगी आहे. खेळाडूंना प्रॅक्टीससाठई टीमच्या बसमधून जाणेच अनिवार्य असणार आहे.
advertisement
7/13
प्रत्येत फ्रेंचायजीला त्यांच्या नेट बॉलर आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्टची यादी बीसीसीआयला देणे अनिवार्य असणार आहे.
advertisement
8/13
खेळाडूंच्या कुटुंबियांना आणि मित्रांना ठरलेल्या ठिकाणी राहण्याची परवानगी आहे. तसेच खेळाडू
advertisement
9/13
खेळाडूंना हिटिंग नेट वापरताना काळजी घ्यावी, जेणेकरून बॉल एलईडी जाहिरात फलकांना लागणार नाही. तसेच सब्स्टिट्यूट खेळाडूंनी एलईडी बोर्डासमोर बसण्यास मनाई आहे.त्यामुळे आता सब्स्टिट्यूट खेळाडूंच्या बसण्याची जागा त्यांच्या संबंधित फ्रेंचायचीद्वारे निश्चित केली जाईल.
advertisement
10/13
ऑरेंज आणि पर्पल कॅप घालणाऱ्या खेळाडूंना सामन्या दरम्यान कॅप घालणे बंधनकारक असणार आहे.
advertisement
11/13
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान खेळाडूंना ड्रेस कोडचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. फ्लॉपी हॅटस आणि स्लिव्हलेस जर्सी घालण्यास परवानगी नाही. जर खेळाडूंनी या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार.
advertisement
12/13
सपोर्ट स्टाफला अधिकृत आयडी कार्ड बाळगणे अनिवार्य आहे. जर पहिल्यांदा आयडी विसरल्यास ताकीद दिली जाईल,त्यानंतर उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होईल. मॅचच्या दिवशी टीम डॉक्टर्ससह 13 सदस्यांनाच मैदानात प्रवेश असणार आहे.
advertisement
13/13
जर संघाला जर्सी नंबर बदलायचा असेल तर त्यांना 24 तास आधी याची माहिती देणे बंधनकारक असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 New Rule : ना रोहित-रितिका, ना विराट-अनुष्का, त्या कपड्यांवरही बंदी...BCCIची IPLसाठीची नवीन नियमावली काय?