IND vs ENG : भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, कुलदीप यादवला प्लेइंग XI मध्ये संधी का नाही? बॉलिंग कोचचा खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Morne Morkel On Kuldeep Yadav : चौथ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी का देण्यात आली नाही? यावर टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने मोठा खुलासा केला आहे.
advertisement
1/7

भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. चौथा सामना गमावल्यास टीम इंडिया मालिका देखील गमावणार आहे.
advertisement
2/7

भारतीय संघाच्या पहिल्या डावात 358 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने आपल्या डावात 7 गडी बाद 544 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे इंग्लंडने आत्तापर्यंत 186 धावांची आघाडी घेतली आहे.
advertisement
3/7
अशातच चौथ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला संधी का देण्यात आली नाही? यावर टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने मोठा खुलासा केला आहे.
advertisement
4/7
गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल याने पत्रकार परिषदेत कुलदीप यादवबद्दल मौन सोडलं. जेव्हा कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं जाईल तेव्हा आपल्याला आपली फलंदाजी कशी मजबूत करता येईल हे देखील पहावे लागेल.
advertisement
5/7
कुलदीप एक चांगला गोलंदाज आहे आणि तो चांगली गोलंदाजी करतो, म्हणून आम्ही त्याला सेट कसं करायचं याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु दुर्दैवाने फलंदाजीसोबत संतुलन राखणं थोडं कठीण होतंय, असं मोर्केल म्हणाला.
advertisement
6/7
मोर्ने मॉर्केल याने संघात एका अतिरिक्त ऑलराऊंडर खेळाडूचा समावेश करण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. कुलदीप यादवला तेव्हाच संधी मिळू शकते जेव्हा टॉप सहा फलंदाज सातत्याने धावा करायला सुरुवात करतील, असं त्याने स्पष्ट केलं आहे.
advertisement
7/7
दरम्यान, मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंना मदत मिळत आहे. परंतू कुलदीपला अद्याप एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, कुलदीप यादवला प्लेइंग XI मध्ये संधी का नाही? बॉलिंग कोचचा खुलासा!