TRENDING:

IND vs NZ : आज बॅट चालली नाही, तर T20 वर्ल्ड कप बेंचवरच जाणार! टीम इंडियाच्या स्टारला शेवटची संधी

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 5 मॅचच्या टी-20 सीरिजला सुरूवात झाली आहे. नागपूरमेध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 48 रननी पराभव केला.
advertisement
1/8
आज बॅट चालली नाही, तर वर्ल्ड कप बेंचवर जाणार! टीम इंडियाच्या स्टारला शेवटची संधी
टी-20 वर्ल्ड कपआधी भारतीय टीमकडे तयारी पूर्ण करण्याची शेवटची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उरलेल्या 4 सामन्यांनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची बॅट शांत राहिली, त्यामुळे या खेळाडूला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रन करावे लागणार आहेत.
advertisement
2/8
टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत खेळवला जाणार आहे. वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या फक्त 4 मॅच शिल्लक आहेत. दुसरी टी-20 रायपूरमध्ये होत आहे. इशान किशनसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
advertisement
3/8
पहिल्या टी-20 सामन्यात इशान किशन अपयशी ठरला, पण दुसऱ्या सामन्यात इशान किशनला आणखी एक संधी मिळेल. या सामन्यातही इशानला रन करता आले नाहीत, तर उरलेल्या 3 टी-20 नाही तर वर्ल्ड कपमध्येही इशानला बेंचवर बसावं लागू शकतं.
advertisement
4/8
पहिल्या टी-20 सामन्यात इशान किशनसह संजू सॅमसनलाही रन करता आले नव्हते, त्यामुळे त्यालाही रन करावे लागणार आहेत. संजूही वारंवार अपयशी ठरला तर वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला त्यांची ओपनिंग जोडी पुन्हा बदलावी लागू शकते.
advertisement
5/8
पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 238 रन केले होते, यात दोन खेळाडूंचं योगदान सर्वाधिक होतं. अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांनी आक्रमक बॅटिंग केली नसती, तर भारताचा स्कोअर 190 पर्यंतही गेला नसता. अभिषेकने 35 बॉलमध्ये 84 रन आणि रिंकूने 20 बॉलमध्ये नाबाद 44 रनची खेळी केली.
advertisement
6/8
रायपूरमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत एकमेव टी-20 मॅच खेळली, ज्यात त्यांना विजय मिळाला. 2023 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रायपूरमध्ये टी-20 मॅच झाली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टीमने त्या सामन्यात 174 रन केले होते, या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 154 रनपर्यंतच मजल मारता आली.
advertisement
7/8
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंग आणि अक्षर पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. रिंकूने 46 रनची आक्रमक खेळी केली, तर अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट घेतल्या.
advertisement
8/8
दुसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : आज बॅट चालली नाही, तर T20 वर्ल्ड कप बेंचवरच जाणार! टीम इंडियाच्या स्टारला शेवटची संधी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल