Team India : विश्वास दाखवला, त्यानेच धोका दिला... T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात पुन्हा बदल होणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही टीम इंडियाचा 7 विकेटने विजय झाला आहे. याचसोबत भारताने 5 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
1/5

न्यूझीलंडने दिलेल्या 209 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. मागच्या सामन्याचा हिरो अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. तर संजू सॅमसन 5 बॉलमध्ये 6 रन करून माघारी परतला.
advertisement
2/5
6 रनवरच टीम इंडियाच्या 2 विकेट गेल्यानंतर इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी न्यूझीलंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. इशान किशनने 32 बॉलमध्ये 237.50 च्या स्ट्राईक रेटने 76 रन केले, ज्यात 11 फोर आणि 4 सिक्सचा समावेश आहे.
advertisement
3/5
सूर्यकुमार यादवने 37 बॉलमध्ये 221.62 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 82 रन केले. सूर्याने त्याच्या इनिंगमध्ये 9 फोर आणि 4 सिक्स मारले. याशिवाय शिवम दुबेने 18 बॉलमध्ये नाबाद 36 रन केले.
advertisement
4/5
पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला असला तरी संजू सॅमसनच्या फॉर्मने टीम इंडियाची चिंता वाढवली आहे. निराश कामगिरीनंतर शुभमन गिलला टीम इंडियातून बाहेर केलं गेलं आणि संजूला पुन्हा ओपनिंगची संधी मिळाली.
advertisement
5/5
गिलला डावलून मिळालेल्या या संधीचं संजूला सोनं करता येत नाहीये, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमध्ये संजूच्या ऐवजी इशान किशनला ओपनिंगला पाठवून तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार टीम इंडिया करू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : विश्वास दाखवला, त्यानेच धोका दिला... T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात पुन्हा बदल होणार!