TRENDING:

IND vs NZ : न्यूझीलंडने अभिषेकचा अभ्यास केला, पण पेपर भलत्यानेच सोडवला, एकहाती मॅच फिरवली

Last Updated:
दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा भारताने यशस्वी पाठलाग करून 7 विकेटसने सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी आघाडी घेतली आहे.
advertisement
1/5
न्यूझीलंडने अभिषेकचा अभ्यास केला, पण पेपर भलत्यानेच सोडवला, एकहाती मॅच फिरवली
दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा भारताने यशस्वी पाठलाग करून 7 विकेटसने सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी आघाडी घेतली आहे.
advertisement
2/5
दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन मैदानात आला होता. यावेळी ईशान किशनने ताबडतोड फलंदाजी करून 21 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर 32 बॉलमध्ये 76 धावा करून बाद झाला होता.
advertisement
3/5
ईशान बाद झाल्यानंतर सूर्याने तुफानी अंदाजात बॅटींग सूरूच ठेवली आणि 23 बॉलमध्ये त्याने आपलं अर्धशतक पुर्ण केलं. त्यानंतर तो पुढे जाऊन 37 बॉलमध्ये 82 धावा करून नाबाद राहिला. तर शिवम दुबेने त्याला 36 धावांची चांगली साथ दिली.
advertisement
4/5
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा ठोकल्या होत्या. न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने 47 धावांची नाबाद वादळी खेळी केली होती. त्याच्यासोबत रचिन रविंद्रने 44 धावांची खेळी केली होती.
advertisement
5/5
टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 2, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती आणि शिवम दुबेने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : न्यूझीलंडने अभिषेकचा अभ्यास केला, पण पेपर भलत्यानेच सोडवला, एकहाती मॅच फिरवली
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल