IND vs NZ : तिसरी मॅच जिंकली, पण 3 चुकांनी टेन्शन वाढवलं, वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची धाकधूक वाढली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजमध्ये 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
advertisement
1/6

न्यूझीलंडने दिलेलं 154 रनचं आव्हान टीम इंडियाने फक्त 10 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्माने 20 बॉलमध्ये 340 च्या स्ट्राईक रेटने 68 रन केले, ज्यात 5 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता.
advertisement
2/6
कर्णधार सूर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये 219.23 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 57 रनची खेळी केली. सूर्याने त्याच्या इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 6 फोर मारल्या. इशान किशन 13 बॉलमध्ये 28 रन करून आऊट झाला.
advertisement
3/6
सीरिजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला असला तरी टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर संजू सॅमसनच्या फॉर्मने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. लागोपाठ तिसऱ्या सामन्यात संजू अपयशी ठरला आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये संजू पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.
advertisement
4/6
टीम इंडियासाठी दुसरी चिंतेची बाब म्हणजे ओपनिंग जोडी. पहिल्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली, पण दुसऱ्या सामन्यात अभिषेक शून्यवर माघारी परतला. या सीरिजमध्ये टीम इंडियाला एकदाही चांगली ओपनिंग पार्टनरशीप मिळालेली नाही.
advertisement
5/6
कुलदीप यादवचा फॉर्मही टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारा आहे. मागच्या 11 इनिंगनंतर पहिल्यांदाच कुलदीपला एकही विकेट मिळाली नाही. वनडे सीरिजमध्येही कुलदीपला त्याचा ठसा पाडण्यात अपयश आलं होतं.
advertisement
6/6
7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे, त्याआधी टीम इंडिया फक्त 2 टी-20 मॅच खेळणार आहे. या दोन सामन्यांमध्ये भारताला त्यांच्या या 3 चुका सुधाराव्या लागणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : तिसरी मॅच जिंकली, पण 3 चुकांनी टेन्शन वाढवलं, वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची धाकधूक वाढली!