Team India : टीम इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकणार का नाही? मॅच गुवाहाटीला पण सूर्या-गंभीरचं लक्ष बंगळुरूकडे!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बॉलरनी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय बॉलर्सनी न्यूझीलंडला 153 रनवर रोखलं. भारताने हे आव्हान फक्त 10 ओव्हरमध्येच पार केलं.
advertisement
1/5

न्यूझीलंडने दिलेल्या 154 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. मॅट हेन्रीच्या बॉलिंगवर संजू सॅमसन पहिल्याच बॉलला बोल्ड झाला. सीरिजच्या सलग तिसऱ्या सामन्यात संजू अपयशी ठरला आहे.
advertisement
2/5
पहिल्या सामन्यात संजू 10 रनवर, दुसऱ्या सामन्यात 6 रनवर आणि आता तिसऱ्या सामन्यात शून्य रनवर संजू माघारी परतला आहे. टी-20 वर्ल्ड कपला आता अवघे दोन आठवडे शिल्लक असताना संजूचा फॉर्म टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.
advertisement
3/5
टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये संजूची निवड झाली आहे, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवायचं असेल तर बंगळुरूमधल्या बीसीसीआयच्या क्रिकेट सेंटर ऑफ एक्सलन्सवर सर्व अवलंबून आहे.
advertisement
4/5
तिलक वर्मा फिट होऊन टीममध्ये आला तर तो तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल. तसंच न्यूझीलंड सीरिजमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळत असलेल्या इशान किशनला ओपनिंगला पाठवून फॉर्ममध्ये नसलेल्या संजूला टीमबाहेर करता येईल, ज्यामुळे टीम इंडियाची चिंता मिटेल.
advertisement
5/5
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्सर पटेल, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, कुलदीप यादव
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकणार का नाही? मॅच गुवाहाटीला पण सूर्या-गंभीरचं लक्ष बंगळुरूकडे!