IND vs PAK Playing 11 : संजू सॅमसन OUT, अभिषेक शर्मा IN... पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियात तीन मोठे बदल, पाहा कुणाला संधी?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Pakistan Playing 11 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होईल. कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जात असल्याने टीम इंडियात तीन मोठे बदल दिसतील.
advertisement
1/7

श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तानला सरप्राईज धक्का देण्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानचा प्लॅन फेल ठरू शकतो.
advertisement
2/7
टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीमध्ये बदल पहायला मिळू शकतो. संजू सॅमसनच्या जागेवर अभिषेक शर्माचं कमबॅक होण्याची शक्यता आहे. अभिषेक शर्मा पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवण्यासाठी समर्थ आहे.
advertisement
3/7
संजू सॅमसनला नामीबियाविरुद्ध संधी मिळाली होती. परंतू त्याला त्याचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे आता अभिषेक शर्मा आणि ईशान किशन पाकिस्तानची वाट लावण्यासाठी सज्ज असतील.
advertisement
4/7
टीम इंडियाचा फिनिशर म्हटल्या जाणाऱ्या रिंकु सिंगला आता बाहेरला रस्ता दाखवला जाऊ शकतो. रिंकु सिंगला मागील दोन्ही सामन्यात चांगली कामगिरी करता येणार नाही. त्यामुळे आता त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री होऊ शकते.
advertisement
5/7
वॉशिंग्टन सुंदर याने आत्तापर्यंत वर्ल्ड कपचा सामना खेळला नाहीये. त्यामुळे आता ऑलराऊंडर म्हणून अक्षर पटेलच्या जोडीला त्याला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. मोठी खेळी करण्यास सुंदर देखील तरबेज आहे.
advertisement
6/7
तर पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडिया प्रेमदासा स्टेडियमवर चार स्पिनर्ससह मैदानात उतरू शकते. कुलदीपने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळला नाही.
advertisement
7/7
दरम्यान, कुलदीप यादवला अर्शदीप सिंगच्या जागेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्शदीप सध्या महागड्या ओव्हर फेकत असून त्याला पाकिस्तानविरुद्ध रेस्ट दिला जाईल, अशी शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK Playing 11 : संजू सॅमसन OUT, अभिषेक शर्मा IN... पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियात तीन मोठे बदल, पाहा कुणाला संधी?