India Semifinal Scenario: थांबा...! टीम इंडियाला अजूनही सेमीफायनल गाठण्याची संधी; पाहा समीकरण
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India Semifinal qualification Scenario : इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडचा पराभव झाला. हरमनप्रीत कौरची एकाकी झुंज अपयशी ठरली. (Women's T20 World Cup)
advertisement
1/7

ऑस्ट्रेलियाने केलेल्या पराभवानंतर आता टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलंय, असं चित्र समोर येतंय. मात्र, टीम इंडियासमोर अजूनही एक संधी आहे. मात्र, टीम इंडियाचं भविष्य पाकिस्तानच्या हातात असणार आहे.
advertisement
2/7
टीम इंडियाला ऑस्ट्रेलिाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला असला तरी देखील टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आलं नाहीये. टीम इंडियासाठी अजूनही संधी आहे.
advertisement
3/7
टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलियाने चारही सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. तर दुसऱ्या क्रमांकावर दोन सामने जिंकणारी टीम इंडिया आहे.
advertisement
4/7
तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ चार पॉईंट्ससह आहे. तसेच पाकिस्तान केवळ एका विजयासह चौथ्या स्थानी दोन पाईंट्ससह आहे. अशातच आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल.
advertisement
5/7
जर न्यूझीलंडने आजच्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं तर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल. पण जर पाकिस्तानने न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केले तर टीम इंडियाला मोठी संधी असेल.
advertisement
6/7
जर सामना अटीतटीचा झाला आणि पाकिस्तानने या सामन्यात बाजी मारली तर टीम इंडियाला सेमीफायनल गाठता येऊ शकणार आहे. पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला 50 धावांच्या फरकाने पराभूत केले तर भारत रन रेटच्या आधारावर सेमीफायनल गाठण्यात यशस्वी होईल.
advertisement
7/7
दरम्यान, जर पाकिस्तान मोठ्या फरकाने जिंकला तर पाकिस्तानसाठी देखील सेमीफायनलचे दरवाजे उघडले जाऊ शकते. पण भारताचा पुढील वर्ल्ड कप सामने खेळायचे असतील तर सामना चुरशीचा व्हायला हवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
India Semifinal Scenario: थांबा...! टीम इंडियाला अजूनही सेमीफायनल गाठण्याची संधी; पाहा समीकरण