T20 World Cup : झटपट पटापट... एका मॅचने ब्रॉडकास्टर मालामाल, India vs Pakistan सामन्याने सगळे रेकॉर्ड मोडले
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल़्ड कपचा सामना खेळवला गेला आणि या सामन्याने सर्वाधिक व्ह्युवरशीपचा रेकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डमुळे ब्रॉडकास्टर मालामाल झाले आहेत.
advertisement
1/9

टी20 वर्ल्डकप 2026 च्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव करून सूपर 8 मध्ये एंन्ट्री मारली आहे.
advertisement
2/9
खरं तर हा सामना होण्याची शक्यता खूपच कमी होते.कारण पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी वर्ल्डकपच्या तोंडावर ड्रामेबाजी सूरू केली होती.
advertisement
3/9
कधी नव्हे तो त्यांना बांग्लादेशचा पोळका आला होता. बांग्लादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात वर्ल्डकप खेळण्यास नकार दिला होता. या नकारानंतर आयसीसीने बांग्लादेशची हकालपट्टी करून स्कॉटलँडला वर्ल्ड कप खेळण्याची संधी दिली होती.
advertisement
4/9
आयसीसीच्या याच भुमिकेमुळे पाकिस्तानने भारतासोबत सामना खेळण्यास नकार दिला होता. पण संभाव्य नुकसान होणार असल्याचे त्यांना लक्षात येताच त्यांनी आयसीसीसमोर अटी ठेवल्या. या अटींपैकी एकाही अटीवर आयसीसीने मंजूरू दिली नव्हती.शेवटी पाकिस्तानला स्वत:च या भूमिकेवरून माघार घ्यावी लागली.
advertisement
5/9
या सगळ्या ड्राम्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल़्ड कपचा सामना खेळवला गेला आणि या सामन्याने सर्वाधिक व्ह्युवरशीपचा रेकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डमुळे ब्रॉडकास्टर मालामाल झाले आहेत.
advertisement
6/9
भारतातील अधिकृत प्रसारण आणि डिजिटल भागीदार असलेल्या जिओस्टारच्या मते, जिओहॉटस्टारवरील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने 163 दशलक्ष इतकी अभूतपूर्व डिजिटल पोहोच नोंदवली, जी आयसीसी टी20 स्पर्धेत आतापर्यंतच्या कोणत्याही सामन्यासाठी सर्वाधिक आहे.
advertisement
7/9
ही वाढ 2024 च्या टी20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्याच्या (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) डिजिटल प्रेक्षकांना मागे टाकते. ही वाढ अत्यंत मजबूत होती. 2024 च्या आवृत्तीतील भारत-पाकिस्तान सामन्यापेक्षा या सामन्याची पोहोच 56 टक्के जास्त होती.
advertisement
8/9
केवळ मोबाइलवर, आयसीसी टी20 स्पर्धेत कोणत्याही लीग-स्टेज सामन्यासाठीची पोहोच ही सर्वाधिक पोहोच ठरली, जी मागील भारत-पाकिस्तान सामन्यापेक्षा 1.2 पट जास्त होती. कनेक्टेड टीव्ही (सीटीव्ही) वर पोहोच 2024 च्या तुलनेत 2.4 पट जास्त होती.
advertisement
9/9
तसेच या सामन्याने टीव्हीवर 71 टक्के टीआरपी वाढ नोंदवली, ज्यामुळे 2021 नंतरचा हा सर्वाधिक रेट असलेला भारत-पाकिस्तान टी20 सामना ठरला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : झटपट पटापट... एका मॅचने ब्रॉडकास्टर मालामाल, India vs Pakistan सामन्याने सगळे रेकॉर्ड मोडले