India vs Pakistan : ज्याची भीती होती तेच झालं, टीम इंडियाचा वीक पॉईंट आला समोर, पाकिस्तान तिथंच नस दाबणार
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs Pakistan, T20 World Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी आता सर्वांची उत्सुकता वाढली असताना भारताचा वीक पॉईंट सर्वांच्या समोर आलाय. पाकिस्तान देखील तिथंच हल्ला करणार असल्याचं समोर आलंय.
advertisement
1/6

दोन मॅच जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आगामी सामना येत्या 15 तारखेला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. आधी नखरे करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीने गुडघ्यावर टेकवलं होतं. अशातच आता दोन्ही देशात सामना खेळवला जाणार आहे.
advertisement
2/6
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काय होणार? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
advertisement
3/6
अशातच श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा वीक पाईंट सर्वांच्या समोर आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला देखील वर्चस्व गाजवण्याची एक संधी मिळेल, अशी शक्यता आहे.
advertisement
4/6
गेल्या दोन्ही मॅचमध्ये दिसून आलंय की, टीम इंडिया स्पिनर्सविरुद्ध कमकुवत झाली आहे. युएसएविरुद्ध आणि नामीबियाविरुद्ध टीम इंडिया स्पिनर्सविरुद्ध अडखळून खेळत होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या स्पिनर्सची कसोटी असणार आहे.
advertisement
5/6
पाकिस्तानाविरुद्धच्या सामन्यात स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची असेल. श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये स्पिनर्सने वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचे आणि पाकिस्तानचे स्पिनर्स मॅच फिरवू शकतील.
advertisement
6/6
दरम्यान, टीम इंडियासमोर सर्वात मोठी अडचण म्हणजे पाकिस्तानकडे पाच स्पिनर्स आहेत. त्यात उस्मान तारिक याची बॉलिंग टीम इंडियाचा अडचणीची ठरू शकते. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष या मॅचवर लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
India vs Pakistan : ज्याची भीती होती तेच झालं, टीम इंडियाचा वीक पॉईंट आला समोर, पाकिस्तान तिथंच नस दाबणार