IPL इतिहासात पहिल्यांदाच...CSK ची अशी प्लेइंग इलेव्हन बघितलीच नसेल, राजस्थानने टॉस जिंकला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. गुवाहाटीच्या स्टेडियमवर हा सामना होत आहे.
advertisement
1/8

चेन्नई आणि राजस्थान यांच्यातला सामना हा दोन्ही टीममधल्या आजी आणि माजी खेळाडूंची लढत म्हणून पाहिला जात आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत रवींद्र जडेजा हा सीएसकेचा आणि संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा भाग होता.
advertisement
2/8
आयपीएल 2026 आधी सीएसके आणि राजस्थान यांच्यात ट्रेड डील झालं आणि संजू सीएसकेकडे तर रवींद्र जडेजा राजस्थानकडे गेले. आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज गायकवाड सीएसकेचा आणि रियान पराग राजस्थानचा कर्णधार आहे.
advertisement
3/8
मोसमाच्या पहिल्याच सामन्याआधी सीएसकेला दुखापतीमुळे मोठे धक्के बसले आहेत. एमएस धोनी हा दुखापतीमुळे किमान दोन आठवडे खेळू शकणार नाही, तर सीएसकेचा फास्ट बॉलर नॅथन एलिस दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. सीएसकेचा बॅटर डेवाल्ड ब्रेविसही या सामन्यात दुखापतीमुळे खेळणार नाही.
advertisement
4/8
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने सीएसकेकडून ट्रेडमध्ये घेतलेला ऑलराऊंडर सॅम करनही दुखापतीमुळे यंदाची आयपीएल खेळू शकणार नाही. करनऐवजी राजस्थानने दासुन शनाकाला टीममध्ये आणलं आहे.
advertisement
5/8
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. पाऊस पडला आहे, त्यामुळे खेळपट्टीवर मॉयस्चर असेल ज्याचा फायदा होऊ शकतो, असं रियान पराग म्हणाला आहे.
advertisement
6/8
बराच काळ खेळपट्टी झाकून ठेवली गेली होती, त्यामुळे आम्हीही टॉस जिंकून बॉलिंगच घेतली असती, असं सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला आहे.
advertisement
7/8
चेन्नईची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, मॅट शॉर्ट, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, खलील अहमद
advertisement
8/8
राजस्थानची प्लेइंग इलेव्हन : वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, शिमरन हेटमायर, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिष्णोई, ब्रिजेश शर्मा
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL इतिहासात पहिल्यांदाच...CSK ची अशी प्लेइंग इलेव्हन बघितलीच नसेल, राजस्थानने टॉस जिंकला!