Priya-Umesh: प्रिया बापटने पहिल्यांदाच कॅमेरासमोर सांगितली 'ती' पर्सनल गोष्ट, म्हणते 'उमेशने मला जवळ घ्यावं अन्...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Priya Bapat-Umesh Kamat: लग्नाला इतकी वर्ष झाली, तरीही प्रिया आणि उमेशमधील केमिस्ट्री आजही तितकीच फ्रेश आणि प्रेमळ वाटते. नुकतंच प्रियाने त्यांच्यातील अनेक पर्सनल गोष्टींचा उलगडा केला आहे.
advertisement
1/8

मराठी सिनेसृष्टीत अनेक जोड्या आहेत, ज्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतातच, पण खऱ्या आयुष्यातील त्यांचं प्रेम पाहून चाहते अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडतात. अशीच एक जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत.
advertisement
2/8
आजवर प्रिया आणि उमेश यांनी अनेक माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता हे दोघं एका नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेबसीरिजचं नाव 'हे काय नवीन?' असं आहे.
advertisement
3/8
लग्नाला इतकी वर्ष झाली, तरीही प्रिया आणि उमेशमधील केमिस्ट्री आजही तितकीच फ्रेश आणि प्रेमळ वाटते. अशातच या वेबसीरिजच्या निमित्ताने प्रियाने त्यांच्या बेडरूम सिक्रेट्सपासून त्यांच्यातील गोड भांडणांपर्यंत अनेक पर्सनल गोष्टींचा उलगडा केला आहे.
advertisement
4/8
प्रिया आणि उमेश जुई आणि साकेतच्या रुपात आणि काय हवं या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. जुई आणि साकेत या जोडीने प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमात पाडलं. आता प्रिया आणि उमेशची 'हे काय नवीन?' ही नवी वेब मालिका लवकरच ZEE5 वर रिलीज होणार आहे.
advertisement
5/8
या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान, प्रिया आणि उमेश यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यातील काही गंमती चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. यावेळी प्रिया म्हणाली, प्रिया म्हणाली, "आम्ही पडद्यावर जसे दिसतो, तसंच आमचं खरं आयुष्यही आहे. पण त्यातही काही अशा गोष्टी आहेत ज्या फक्त आम्हालाच ठाऊक आहेत."
advertisement
6/8
प्रियाने यावेळी एक अतिशय खाजगी पण तितकाच गोड किस्सा शेअर केला. ती म्हणाली, "मी लहानपणापासून एक गोष्ट करत आले आहे, जी आधी आईसोबत करायचे आणि आता उमेशसोबत करते. जेव्हा माझं उमेशसोबत कडाक्याचं भांडण होतं किंवा मी खूप चिडलेली असते, तेव्हा मी रागाच्या भरात त्याला म्हणते, 'आता मी तुझ्याकडे कधीच येणार नाही. तू पण माझ्याकडे बघू नकोस आणि माझ्याजवळ तर अजिबात येऊ नकोस!'"
advertisement
7/8
प्रिया पुढे हसत म्हणाली, "मी असं म्हणत असले तरी मनातून मात्र मला अगदी उलट हवं असतं. उमेशला हे बरोबर ठाऊक आहे. मी जेव्हा त्याला लांब ढकलते, तेव्हा खरंतर त्याने मला जवळ घेऊन मला घट्ट मिठी मारावी आणि समजावून सांगावं, हीच माझी अपेक्षा असते. आणि उमेश नेमकी तीच गोष्ट करतो."
advertisement
8/8
उमेशच्या स्वभावाबद्दल बोलताना प्रिया म्हणाली की, उमेश तिच्यासारखा लगेच व्यक्त होत नाही. "उमेशच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा तो पूर्णपणे शांत होतो. तो काहीच बोलत नाही, पण मला त्याच्याकडे बघून लगेच समजतं की त्याला आता माझी गरज आहे. अशा वेळी मी काहीही न बोलता फक्त त्याच्यासोबत असते, त्याचा हात हातात धरून बसते. आमचं हे न बोलता संवाद साधणं, हेच आमच्या नात्याचं यश आहे."<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya-Umesh: प्रिया बापटने पहिल्यांदाच कॅमेरासमोर सांगितली 'ती' पर्सनल गोष्ट, म्हणते 'उमेशने मला जवळ घ्यावं अन्...'