TRENDING:

'अशा दहा भाजपा उभ्या करू शकतो', ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेंचा इशारा, जहाल शब्दात व्यक्त केल्या भावना

Last Updated:
Sharad Ponkshe on BJP: नागपुरात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 'रामस्मरण' व्याख्यानमालेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी भाजप आणि संघ यांच्यातील नात्यावर भाष्य करताना अतिशय जहाल शब्द वापरले.
advertisement
1/7
'अशा दहा भाजपा उभ्या करू शकतो', ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेंचा इशारा
मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. याआधी त्यांनी अनेकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी वक्तव्ये केली आहेत. अशातच त्यांच्या विधानाने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
2/7
नुकतंच नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित एका व्याख्यानमालेला त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या भाषणातून त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे. "आम्हाला आता कोणीच हरवू शकत नाही," या भ्रमात भाजपने राहू नये, असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद काय आहे, याची जाणीव भाजपला करून दिली.
advertisement
3/7
नागपुरात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित 'रामस्मरण' व्याख्यानमालेत 'भारत एक हिंदू राष्ट्र' या विषयावर ते बोलत होते. यावेळी शरद पोंक्षे यांनी भाजप आणि संघ यांच्यातील नात्यावर भाष्य करताना अतिशय जहाल शब्द वापरले.
advertisement
4/7
पोंक्षे म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची आई आहे. आज देशात हिंदू आपले सण अभिमानाने साजरे करत आहेत, 'गर्वाने सांगा आम्ही हिंदू आहोत' म्हणण्याची ताकद मोदी सरकारमुळे आली आहे, हे सर्वांना मान्य आहे. पण या यशाचं श्रेय मोदींसोबतच शंभर वर्ष उपेक्षा सहन करणाऱ्या संघाला जातं."
advertisement
5/7
मात्र, पोंक्षे इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भाजपाला सूचक इशाराही दिला. ते म्हणाले, उद्या भाजपाची काँग्रेस व्हायला लागली, तर संघ अशा १० भाजपा उभ्या करू शकतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. संघाला पुन्हा १०-१५ वर्ष वाट पाहावी लागली तरी चालेल, पण कट्टर हिंदूंच्या १० भाजपा उभ्या करण्याची ताकद संघात आहे, हे भाजपने विसरू नये."
advertisement
6/7
यावेळी पोंक्षेंनी मनुस्मृतीवरून झालेल्या वादावरही त्यांची भूमिका मांडली. विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले, "मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम वागणूक देण्यात आलेली नाही. ज्यांनी मनुस्मृती जाळली, त्यांनी ती कधीच वाचली नसेल. अन्यथा त्यांनी ती कधीच जाळली नसती."
advertisement
7/7
राहुल गांधींविषयी शरद पोंक्षे यांनी अतिशय जहाल शब्दात टीका केली, त्यांनी म्हटलं की, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले असते, तर देशाचं वाटोळं झालं असतं. काँग्रेसच्या कोणत्याही आंदोलनाने देशाचं भलं झालेलं नाही किंवा देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही. कारण मुळातच हा देश ब्रिटिशांनी स्थापन केलेला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अशा दहा भाजपा उभ्या करू शकतो', ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेंचा इशारा, जहाल शब्दात व्यक्त केल्या भावना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल