TRENDING:

9.2 रेटिंगची सीरिज ठरली OTT ची बादशाह! 5 वर्षांपासून कायम आहे दबदबा, तिसरं सीझन पाहून ढसाढसा रडाल

Last Updated:
OTT Must Watch Series: एक वेबसीरिज आहे, जी गेल्या पाच वर्षांपासून ओटीटीवर राज्य करत आहे. या सीरिजची क्रेझ इतकी आहे की तिला IMDb ने ९.२ इतकं तगडं रेटिंग दिलं आहे.
advertisement
1/7
9.2 रेटिंगची सीरिज ठरली OTT ची बादशाह! 5 वर्षांपासून कायम आहे दबदबा
ओटीटीवर अनेक सीरिज आणि फिल्म्स रिलीज होत असतात. मात्र काही कंटेंट असा असतो, जो प्रेक्षकांच्या मनात घर करतो. अशीच एक वेबसीरिज आहे, जी गेल्या पाच वर्षांपासून ओटीटीवर राज्य करत आहे. या सीरिजची क्रेझ इतकी आहे की तिला IMDb ने ९.२ इतकं तगडं रेटिंग दिलं आहे.
advertisement
2/7
२०२१ साली एक वेबसीरिज रिलीज झाली आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या गर्दीत तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. तब्बल पाच वर्षांनंतरही या सीरिजचं साम्राज्य कोणीही हलवू शकलेलं नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या काळजाला भिडलेल्या या सीरिजचं नाव आहे 'एस्पिरेंट्स' (Aspirants).
advertisement
3/7
टीव्हीएफने नेहमीच सामान्यांच्या व्यथा पडद्यावर मांडल्या. 'एस्पिरेंट्स'मध्ये दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये यूपीएससीची तयारी करणाऱ्या अभिलाष, गुरी आणि एसके या तीन मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
advertisement
4/7
या सीरिजमध्ये कोणताही मोठा स्टार नाही, ना कोणतं बिग बजेट, तरीही या सीरिजने दाखवून दिलं की खऱ्या कंटेंटची ताकद काय असते. या सीरिजने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं, कारण त्यात दाखवण्यात आलेला संघर्ष खरा होता.
advertisement
5/7
या सीरिजमध्ये आपण अभिलाषची जिद्द, गुरीचा मोकळेपणा आणि एसकेचा समजूतदारपणा पाहू शकतो. त्यांच्या या प्रवासात त्यांना भेटलेले 'संदीप भैया' तर प्रेक्षकांच्या काळजाला भिडले.
advertisement
6/7
या सीरिजने केवळ एक सुंदर कथाच दिली नाही, तर सिनेसृष्टीला काही दर्जेदार कलाकार दिले. अभिलाषचे पात्र साकारणारा नवीन कस्तुरिया, संदीप भैयाची भूमिका साकारणारा सनी हिंदुजा, एसकेचे पात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा शिवांकित सिंह परिहार आणि नमिता दुबे यांच्या अभिनयाने सीरिजमध्ये एक वेगळीच रंगत आणली.
advertisement
7/7
आतापर्यंत या सीरिजचे तीन सीझन आले असून प्रत्येक सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. स्पर्धा परीक्षेच्या ओझ्याखाली मैत्री कशी भरडली जाते, अहंकार कसा आडवा येतो आणि शेवटी माणूस म्हणून आपण कसे घडतो, याचं उत्तम मिश्रण या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. ही सीरिज तुम्ही प्राइम व्हिडिओ (Prime Video) वर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
9.2 रेटिंगची सीरिज ठरली OTT ची बादशाह! 5 वर्षांपासून कायम आहे दबदबा, तिसरं सीझन पाहून ढसाढसा रडाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल