IPL 2026 : मला काढून चूक केलीत... जडेजाने पहिल्याच बॉलला चुकता केला CSK चा हिशोब!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
Ravindra Jadeja : आयपीएल 2026 च्या लिलावाआधी चेन्नई सुपरकिंग्सने रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्सकडे ट्रेड केलं, यानंतर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात जडेजाने राजस्थानकडून खेळत असताना सीएसकेचा हिशोब चुकता केला आहे.
advertisement
1/8

आयपीएल 2025 च्या मोसमात शेवटच्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्सने या मोसमाआधी टीममध्ये मोठे बदल केले. रवींद्र जडेजा आणि सॅम करन या दोन्ही खेळाडूंना चेन्नईने राजस्थानसोबत ट्रेड केलं.
advertisement
2/8
जडेजा आणि करनला ट्रेड केल्यानंतर सीएसकेने राजस्थानकडून संजू सॅमसनला टीममध्ये आणलं. याशिवाय चेन्नईने लिलावामध्ये कार्तिक शर्मासाठी 14.20 कोटी आणि प्रशांत वीरसाठीही 14.20 कोटी मोजले, याशिवाय चेन्नईने सरफराज खानलाही टीममध्ये घेतलं.
advertisement
3/8
आयपीएल 2026 मध्ये मागच्या वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी चेन्नईने नवे चेहरे टीममध्ये आणले, पण मोसमाच्या आधीच त्यांना एका मागोमाग एक धक्के बसले.
advertisement
4/8
ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर नॅथन एलिस हा दुखापतीमुळे पूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे, तर सीएसकेचा पाया असलेला धोनीही दुखापत झाल्यामुळे किमान दोन आठवडे खेळू शकणार नाही. याशिवाय आक्रमक बॅट्समन डेवाल्ड ब्रेविस हा दुखापतीमुळे राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातून बाहेर झाला.
advertisement
5/8
आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स पहिले बॅटिंगला आली, त्यानंतर त्यांची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्या 10.3 ओव्हरमध्येच चेन्नईने त्यांच्या 7 विकेट गमावल्या. पॉवर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये सीएसकेचा स्कोअर 41/4 एवढा होता.
advertisement
6/8
पॉवर प्ले संपल्यानंतर 8 व्या ओव्हरमध्ये राजस्थानने रवींद्र जडेजाच्या हातात बॉल दिला आणि त्यानंतर जडेजाने लगेचच आपल्याला सोडून चूक केल्याचं सीएसकेला दाखवून दिलं.
advertisement
7/8
आठव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला जडेजाने सरफराज खानला 17 रनवर एलबीडब्ल्यू केलं, यानंतर याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलला जडेजाने धोकादायक शिवम दुबेला 6 रनवर माघारी पाठवलं.
advertisement
8/8
रवींद्र जडेजाने त्याच्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 18 रन देऊन सीएसकेच्या 2 धोकादायक खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. मागच्या काही काळापासून जडेजाच्या फॉर्मबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, पण या सगळ्याला जडेजाने पहिल्या सामन्यातून उत्तर तर दिलंच, पण सीएसकेचा जुना हिशोबही चुकता केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मला काढून चूक केलीत... जडेजाने पहिल्याच बॉलला चुकता केला CSK चा हिशोब!