TRENDING:

IPL 2026 नंतर रिटायर होणार 5 दिग्गज... मुंबई इंडियन्सचा सुपरस्टारही लिस्टमध्ये!

Last Updated:
आयपीएल 2026 ला 28 मार्च पासून सुरूवात होणार आहे. आयपीएलचा यंदाचा मोसम अनेक अनुभवी खेळाडूंसाठी शेवटचा ठरू शकतो, यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स आणि केकेआरच्या दिग्गज खेळाडूचंही नाव समोर येत आहे.
advertisement
1/7
IPL 2026 नंतर रिटायर होणार 5 दिग्गज... मुंबई इंडियन्सचा सुपरस्टारही लिस्टमध्ये!
आयपीएल 2026 चा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. यंदाची आयपीएल 5 दिग्गज खेळाडूंसाठी शेवटची ठरू शकते. वय आणि फॉर्म हे त्यांच्या निवृत्तीचं प्रमुख कारण असू शकतं.
advertisement
2/7
या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नाव एमएस धोनीचं आहे. मागच्या बऱ्याच आयपीएलपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे, पण प्रत्येक मोसमात धोनी या चर्चा निरर्थक ठरवतो आणि मैदानात उतरतो. यंदा मात्र स्वत: धोनीने हा शेवटचा सिझन असू शकतो, असे संकेत दिले आहेत.
advertisement
3/7
एमएस धोनीचं वय 44 आहे, त्यामुळे त्याच्यासाठी पुढच्या मोसमात फिट होऊन येणं कठीण आहे. सीएसकेने संजू सॅमसनला धोनीचा उत्तराधिकारी म्हणून टीममध्ये आणलं आहे. सीएसकेला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीने आयपीएलमध्ये 5,321 रन केले आहेत.
advertisement
4/7
अजिंक्य रहाणेही या मोसमानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. रहाणे हा या आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या केकेआरचा कर्णधार आहे. रहाणे आयपीएलमध्ये मुंबई, राजस्थान, सीएसके, पुणे आणि केकेआरकडून खेळला आहे. 198 सामन्यांमध्ये त्याने 5,032 रन केल्या आहेत.
advertisement
5/7
काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादचा फास्ट बॉलर हर्षल पटेल याची कामगिरी ढासळली आहे. या मोसमात हर्षल पटेलची कामगिरी निराशाजनक झाली तर त्याच्याकडे निवृत्ती घेण्याशिवाय पर्याय नसेल. 2021 साली आरसीबी आणि 2024 साली पंजाब किंग्सकडून खेळताना हर्षल पटेलने पर्पल कॅप जिंकली होती.
advertisement
6/7
गुजरात टायटन्सचा फास्ट बॉलर इशांत शर्मादेखील या यादीत आहे. वाढत्या वयामुळे इशांत कमी मॅच खेळतो, त्यामुळे आयपीएल 2026 नंतर तो संन्यास घेऊ शकतो. इशांत आयपीएलमध्ये केकेआर, दिल्लीसह एकूण 7 टीमकडून खेळला. 117 सामन्यांमध्ये इशांतने 96 विकेट घेतल्या.
advertisement
7/7
मुंबई इंडियन्सचा स्टार फास्ट बॉलर ट्रेंट बोल्टही त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असणारा बोल्ट जगभरातल्या टी-20 लीगमध्ये खेळतो. आयपीएलमध्ये बोल्ट राजस्थान, दिल्ली आणि केकेआरकडून खेळला आहे. 120 सामन्यांमध्ये बोल्टने 143 विकेट घेतल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 नंतर रिटायर होणार 5 दिग्गज... मुंबई इंडियन्सचा सुपरस्टारही लिस्टमध्ये!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल