IPL 2026 : दोन पराभव होताच KKR मध्ये मोठे उलटफेर, ट्रॉफी जिंकवणारे दोन्ही खेळाडू रहाणेच्या टीममधून बाहेर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये केकेआरचा सामना पंजाब किंग्सविरुद्ध होत आहे. यंदाच्या मोसमात केकेआरची कामगिरी निराशाजनक झाली आहे, तर पंजाब मात्र धमाकेदार क्रिकेट खेळत आहे.
advertisement
1/8

आयपीएल 2026 मध्ये केकेआरला अजून एकही सामना जिंकता आलेला नाही. 2 मॅच खेळल्यानंतर केकेआरची टीम पॉईंट्स टेबलमध्ये -1.964 नेट रनरेटसह नवव्या क्रमांकावर आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर केकेआरसाठी प्ले-ऑफचा प्रवास आणखी कठीण होईल.
advertisement
2/8
दुसरीकडे पंजाब किंग्सने मात्र या मोसमातल्या दोन सामन्यांपैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे. केकेआरचा पराभव करून नेट रनरेट चांगला करण्याचा प्रयत्न पंजाबचा असेल.
advertisement
3/8
केकेआरला या मोसमात बॅटिंगसोबतच बॉलिंगनेही दगा दिला आहे. अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी वगळता केकेआरच्या बॅटिंगला संघर्ष करावा लागला आहे. याशिवाय वरुण चक्रवर्तीचा फॉर्मही केकेआरसाठी चिंतेचा विषय आहे.
advertisement
4/8
दुसरीकडे पंजाब किंग्सने मागच्या आयपीएलचा फॉर्म कायम ठेवला आहे. पंजाब किंग्सच्या बॅटिंगसोबत बॉलिंगनेही या मोसमात धमाका केला आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात पंजाब फायनलपर्यंत पोहोचली होती.
advertisement
5/8
या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. केकेआरने या सामन्यात दोन बदल केले आहेत. वरुण चक्रवर्तीला दुखापत झाली आहे तर सुनिल नारायण आजारी असल्याचं अजिंक्य रहाणेने सांगितलं.
advertisement
6/8
मी टॉस जिंकला असता तरी बॉलिंगच घेतली असती, त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या निर्णयामुळे मी खूश आहे, असं पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या टीममध्ये एकही बदल केलेला नाही.
advertisement
7/8
पंजाबची प्लेइंग इलेव्हन : प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, कुपर कॉनली, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यानसन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैश्यक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
advertisement
8/8
केकेआरची प्लेइंग इलेव्हन : फिन ऍलन, अजिंक्य रहाणे, कॅमरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी, रोव्हमन पॉवेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, नवदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : दोन पराभव होताच KKR मध्ये मोठे उलटफेर, ट्रॉफी जिंकवणारे दोन्ही खेळाडू रहाणेच्या टीममधून बाहेर!