IND vs NZ : ना विराट कोहली, ना केएल राहुल; खरा मॅचविनर 24 वर्षांचा खेळाडू! शुभमन गिलनने कौतुकाचा एक शब्दही काढला नाही
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
New zealand vs india, Harshit Rana : टीम इंडियासाठी विराट कोहली अन् श्रेयस अय्यर यांची खेळी महत्त्वाची ठरली पण अखेरीस हर्षित राणाने आपली बॅट तळपवली अन् मॅच खिशात घालून दिली.
advertisement
1/5

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला. त्यामुळे आता मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने या मॅचमध्ये 93 धावांची खेळी केली.
advertisement
2/5
विराट कोहलीचं शतक फक्त 7 धावांनी हुकलं. पण त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर केएल राहुलने या मॅचमध्ये फिनिशिंगची महत्त्वाची भूमिका बजावली.
advertisement
3/5
केएल राहुलने अखेरीस विजयी सिक्स खेचला अन् टीम इंडियाचा 4 विकेट्सने विजय निश्चित केला. मात्र, टीम इंडियासाठी खरा मॅचविनर तर वेगळाच ठरला. ज्याची कुणीच दखल देखील घेतली नाही.
advertisement
4/5
हा मॅचविनर दुसरा तिसरा कुणी नसून हर्षित राणा आहे. गंभीरच्या लाडक्या हर्षित राणाने 23 बॉलमध्ये अखेरीस 29 धावांची मॅचविनिंग खेळी केली. ज्यावेळी केएल राहुल एकटा उभा होता त्यावेळी त्याने आपली बॅट तलवारीसारखी चालवली.
advertisement
5/5
दरम्यान, हर्षित राणाने बॅटिंगनेच नाही तर बॉलिंगने देखील कमाल केली. टीम इंडियाला 22 व्या ओव्हरमध्ये पहिली विकेट घेऊन दिली अन् दोन मोठे ब्रेकआऊट दिले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : ना विराट कोहली, ना केएल राहुल; खरा मॅचविनर 24 वर्षांचा खेळाडू! शुभमन गिलनने कौतुकाचा एक शब्दही काढला नाही