TRENDING:

धोनीच नाही 'या' स्टार खेळाडूंनीही त्यांच्या ट्रेडमार्क आणि निकनेमचं केलंय रजिस्ट्रेशन; 4 तर भारतीय खेळाडू

Last Updated:
एमएस धोनीने 'कॅप्टन कूल' या टोपणनावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. मैदानावर त्याच्या शांत वागण्यामुळे लोक त्याला या नावाने हाक मारतात.पण फक्त धोनीचं नाही अनेक खेळाडूंनी त्यांच निकनेम आणि ट्रेडमार्कच रजिस्ट्रेशन केलं आहे.
advertisement
1/7
धोनीचं नाही 'या' स्टार खेळाडूंनीही त्यांच्या ट्रेडमार्कचं केलंय रजिस्ट्रेशन
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या टोपणनावेसाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. मैदानावर त्याच्या शांत वागण्यामुळे लोक त्याला या नावाने हाक मारतात. धोनीने केलेल्या अर्जाला मान्यता देखील मिळाली आहे. पण फक्त धोनीचं नाही तर आणखी अनेक स्टार खेळाडूंनी त्यांच्या निकनेमचा ट्रेडमार्क केला आहे.
advertisement
2/7
मायकल जॉर्डन : बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डनने त्याचा प्रसिद्ध 'जंपमॅन' लोगो ट्रेडमार्क केला आहे, ज्यामध्ये तो हवेत उडी मारताना आणि बास्केटबॉल गोलमध्ये चेंडू टाकण्याच्या तयारीत असल्याचे दाखवले आहे. नाइक देखील त्यांच्या एअर जॉर्डन शूजवर मायकल जॉर्डनची हीच पोज वापरते.
advertisement
3/7
ख्रिस्तियानो रोनाल्डो : दिग्गज फुटबॉल खेळाडू रोनाल्डोने "CR7" ट्रेडमार्क केला आहे. "CR7", हा एक ब्रँड आहे जो कपडे, सुगंध आणि आदरातिथ्य यासह अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
advertisement
4/7
सेरेना विल्यम्स : टेनिस क्वीन सेरेनाने तिचे नाव आणि लोगो ट्रेडमार्क केला आहे, ज्यामुळे फॅशन आणि व्यवसायातील तिच्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळते.
advertisement
5/7
विराट कोहली : भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने त्याचे नाव आणि 'व्हीके' लोगो ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत केला आहे. कोहली हा जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे. अलीकडेच विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
advertisement
6/7
सचिन तेंडुलकर : भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने 'मास्टर ब्लास्टर' हे टोपणनाव ट्रेडमार्क म्हणून नोंदवले आहे. तेंडुलकरला 'मास्टर ब्लास्टर' हे टोपणनाव देण्यात आले होते. आजही चाहते तेंडुलकरला त्याच्या टोपणनावाने 'मास्टर ब्लास्टर' असे म्हणतात. सचिन तेंडुलकर हा 100 शतके करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे.
advertisement
7/7
रोहित शर्मा : रोहित शर्माने त्याचे 'हिटमॅन' हे टोपणनाव ट्रेडमार्क म्हणून नोंदवले आहे. चाहते रोहितला हिट मॅन या टोपणनावाने संबोधतात. रोहितने अलीकडेच प्रथम टी-20 आणि नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेट खेळत राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
धोनीच नाही 'या' स्टार खेळाडूंनीही त्यांच्या ट्रेडमार्क आणि निकनेमचं केलंय रजिस्ट्रेशन; 4 तर भारतीय खेळाडू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल