IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का! संजू सॅमसन नाही तर ऋषभ पंतच्या जागी 24 वर्षाच्या खेळाडूची एन्ट्री! पाहा कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rishabh Pant ruled out Dhruv Jurel named replacement : पंतच्या अनुपस्थितीत निवड समितीने ध्रुव जुरेल याला बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे, बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली आहे. जुरेल तातडीने भारतीय स्क्वॉडमध्ये सामील झाला असून त्याने सराव देखील सुरू केला आहे.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापतीमुळे आगामी वनडे सिरीजमधून बाहेर पडावे लागले आहे. शनिवारी नेट प्रॅक्टिसमध्ये बॅटिंग करत असताना त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूला अचानक त्रास जाणवू लागला.
advertisement
2/7
त्यानंतर त्याला तातडीने एमआरआय स्कॅनसाठी नेण्यात आले. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर असे समोर आले आहे की, पंतला 'साईड स्ट्रेन' म्हणजेच स्नायू फाटल्याची दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो आता या मॅचेस खेळू शकणार नाही.
advertisement
3/7
पंतच्या अनुपस्थितीत निवड समितीने ध्रुव जुरेल याला बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे, बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली आहे. जुरेल तातडीने भारतीय स्क्वॉडमध्ये सामील झाला असून त्याने सराव देखील सुरू केला आहे.
advertisement
4/7
वनडे फॉरमॅटमध्ये आपली छाप पाडण्यासाठी जुरेलसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. संघात आता केएल राहुल आणि ध्रुव जुरेल असे 2 विकेटकीपर पर्याय उपलब्ध आहेत. संधी मिळाली तर जुरेल आगामी मॅचमध्ये कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
5/7
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली आता भारतीय संघ नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. या अपडेटेड स्क्वॉडमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या ऐवजी अर्शदीप सिंह यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
advertisement
6/7
ऋषभ पंत नसला तरी टीमची बॅटिंग लाईनअप अजूनही मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे. तिन्ही सामन्यांमध्ये एकदा तरी ध्रुवला संधी मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
7/7
भारताचा वनडे संघ: शुभमन गिल (C), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (WK), श्रेयस अय्यर (VC), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरैल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाला मोठा धक्का! संजू सॅमसन नाही तर ऋषभ पंतच्या जागी 24 वर्षाच्या खेळाडूची एन्ट्री! पाहा कोण?