TRENDING:

IND vs PAK : 'आम्ही कोलंबोला जाणार', सूर्याने जाहीर करताच पाकिस्तानी कॅप्टन भडकला, संघाची संपूर्ण स्ट्रेटेजीच फोडली

Last Updated:
येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरूवात करणार आहे. पण त्याआधी भारत पाकिस्तान सामन्याच्या वादावर पडदा पडला नाही आहे.
advertisement
1/8
'आम्ही कोलंबोला जाणार', सूर्याने जाहीर करताच पाकिस्तानी कॅप्टन भडकला, संघाची संप
येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरूवात करणार आहे. पण त्याआधी भारत पाकिस्तान सामन्याच्या वादावर पडदा पडला नाही आहे.
advertisement
2/8
15 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेच्या कोलंबोतील आर. प्रेमदासा मैदानावर हा सामना पार पडणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
3/8
याच हायव्होल्टेज सामन्यावर आता टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
4/8
15 फेब्रुवारीसाठी कोलंबोचं आमचं विमानाच तिकीट बुक झालं आहे, आम्ही तिकडे जाऊ आणि पाहू काय होतंय, असं सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कपआधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगून टाकलं आहे.
advertisement
5/8
सूर्यकुमार यादवच्या या विधानानंतर पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाने प्रतिक्रिया दिली आहे.टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध सामना न खेळणे हा पूर्णपणे पाकिस्तान सरकारचा निर्णय असल्याचे आगाने सांगितले आहे.
advertisement
6/8
''भारता विरूद्धचा सामना हा आमच्या नियंत्रणात नाही आहे. हा सरकारचा निर्णय आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्यामुळे आमची सरकार आम्हाला जे काही सांगेल ते आम्ही करू'',असे आघाने कोलंबोमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.
advertisement
7/8
वर्ल्ड कपमध्ये आमचे तीन सामने आहेत आणि त्या सामन्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत,असे सलमान आगाने सांगितले आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्याला पाकिस्तानने वगळले आहे.
advertisement
8/8
पाकिस्तानने घेतलेली ही भूमिका त्यांना खूप महागात पडणार आहे. भारत पाकिस्तान सामन्यातून आयसीसीला खूप महसूल मिळतो, तसेच प्रायोजकांचे देखील सामना रद्द झाल्याने मोठं नुकसान होणार आहे.त्यामुळे आयसीसी कारवाईत पाकिस्तानचा उत्पन्न रोखणार आहे आणि आणखी काही मोठी कारवाई होण्याची देखील शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'आम्ही कोलंबोला जाणार', सूर्याने जाहीर करताच पाकिस्तानी कॅप्टन भडकला, संघाची संपूर्ण स्ट्रेटेजीच फोडली
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल