T20 World Cup : वरूण चक्रवर्तीला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणार की नाही? सूर्याने एका वाक्यात विषय संपवला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दरम्यान या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषेदत सूर्याने फायनल सामन्यावरील प्रत्येक सामन्यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
advertisement
1/8

उद्या रविवारी 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/8
या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारताला सलग दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याची नामी संधी आहे. तसेच अहमदाबादच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ ठरणार आहे.
advertisement
3/8
वर्ल्ड कप फायनल सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले जातील अशी चर्चा आहे.अभिषेक शर्माला बाहेर बसवून त्याच्या जागी रिंकु सिंहला संघात जागा दिली जाईल.
advertisement
4/8
तसेच टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती याला बेंचवर बसवून त्याच्या जागी कुलदीप यादव याला खेळवले जाईल,असे बोलले जात आहे.
advertisement
5/8
अभिषेक शर्मा त्याची एक अर्धशतकीय खेळी वगळता संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरला आहे. तर इंग्लंड विरूद्ध सेमी फायनल सामन्यात वरूण चक्रवर्तीची प्रचंड धुलाई झाली होती.त्यामुळे फायनलमध्ये देखील अशी अवस्था होऊ नये यासाठी कुलदीप यादवला संधी देण्याची शक्यता आहे.
advertisement
6/8
दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेमध्ये वरून चक्रवर्तीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करणार का? असा सवाल सूर्यकुमार यादवला विचारण्यात आला होता. यावर सूर्याने वरूण चक्रवर्तीची पाठराखण केली आहे.
advertisement
7/8
वरुणचा फॉर्म हा चिंतेचा विषय नाही.आम्ही सामना जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आणि तो वर्ल्ड नंबर 1 गोलंदाज आहे,त्याला माहित आहे की या संघाला कसे जिंकवायचे, असे सांगत सूर्य कुमार यादवने सगळ्यांची बोलती बंद केली आहे.
advertisement
8/8
दरम्यान वरूण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा या दोघांना सूर्यकुमार यादव संघात कायम ठेवणार असल्याचीही माहिती आहे.असे जर झाल्यास फायनलमध्ये टीम इंडियात कोणताच बदल होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वरूण चक्रवर्तीला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणार की नाही? सूर्याने एका वाक्यात विषय संपवला