IND vs PAK : जय शाहांनी बाहेर काढलं 'ब्रम्हास्त्र', नक्वीच्या मुळावर घाव, यू-टर्न घेऊन पाकिस्तान मॅच खेळणार!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरुद्धचा 15 फेब्रुवारीचा सामना खेळायला नकार दिला आहे. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कारवाईचा इशारा दिला आहे.
advertisement
1/6

टी-20 वर्ल्ड कप फक्त 3 दिवसांवर आलेला असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नौटंकी संपण्याचं नाव घेत नाहीये. 15 तारखेला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी पाकिस्तानने दिली आहे.
advertisement
2/6
पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकला तर फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डच नाही तर आयसीसीचंही मोठं आर्थिक नुकसान होणार आहे, त्यामुळे आयसीसीने पाकिस्तानला त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितलं आहे. तसंच मॅच झाली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आयसीसीने दिला आहे.
advertisement
3/6
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बहिष्काराच्या निर्णयावरून यू टर्न घेईल, असं बोललं जात आहे. बांगलादेशमध्ये 12 फेब्रुवारीला निवडणुका होत आहेत, तर भारत-पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला आहे, त्यामुळे बांगलादेशच्या निवडणुकीनंतर पाकिस्तान यू-टर्न घेण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
याआधी आशिया कपमध्येही पाकिस्तानने बहिष्काराची धमकी दिली होती, पण त्यानंतर पाकिस्तानची टीम मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली होती, यंदाही पाकिस्तानची ही धमकी पोकळ ठरेल, असंच मत माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
advertisement
5/6
दरम्यान आयसीसीने पाकिस्तानवर शेवटचं ब्रम्हास्त्र उगारलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे यू-टर्न घेण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. पाकिस्तानने जर सामना खेळायला नकार दिला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
advertisement
6/6
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसी पाकिस्तानला वार्षिक महसूल म्हणून 35 दशलक्ष युएस डॉलर देते. भारत-पाकिस्तान सामना झाला नाही, तर आयसीसी पाकिस्तानच्या वार्षिक महसुलाचा 35 दशलक्ष युएस डॉलर हा हिस्सा थेट ब्रॉडकास्टरना देईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : जय शाहांनी बाहेर काढलं 'ब्रम्हास्त्र', नक्वीच्या मुळावर घाव, यू-टर्न घेऊन पाकिस्तान मॅच खेळणार!