IND vs NAM : मोक्याच्या क्षणी टीम इंडियात 2 बदल, अभिषेक-सिराज बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये युएसएविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला, त्यानंतर आता भारतीय टीम दुसरा सामना नामिबियाविरुद्ध खेळत आहे.
advertisement
1/5

युएसएविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर गडगडली होती. 77 रनवरच टीम इंडियाचे दिग्गज बॅटर पॅव्हेलियनमध्ये परतले, पण कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे भारताला मोठा स्कोअर करता आला. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला या चुका टाळाव्या लागणार आहेत.
advertisement
2/5
या सामन्यात नामिबियाच्या कर्णधाराने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आम्ही टॉस जिंकला असता कर बॅटिंगच घेतली असती. जोपर्यंत आम्ही टॉस हरतोय आणि मॅच जिंकतोय तोपर्यंत काहीही फरक पडणार नाही.
advertisement
3/5
या सामन्यासाठी टीम इंडियात दोन बदल करण्यात आले आहेत. अभिषेक शर्माऐवजी संजू सॅमसनची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली आहे. तर मोहम्मद सिराजऐवजी जसप्रीत बुमराह टीममध्ये आला आहे.
advertisement
4/5
अभिषेक शर्मा आणि इशान किशन या सामन्यात खेळणार का नाही? याबाबत साशंकता होती. कारण पोटदुखीमुळे अभिषेक शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तर इशान किशनला बुधवारी नेट प्रॅक्टिसमध्ये जसप्रीत बुमराहचा बॉल लागला होता.
advertisement
5/5
भारताची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NAM : मोक्याच्या क्षणी टीम इंडियात 2 बदल, अभिषेक-सिराज बाहेर, प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी?