Abhishek Sharma : झिम्बाब्वेकडून तरी शिकायचं होतं! हिरोगिरी करायला गेलेला अभिषेक कुठे चुकला?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 175 रन केले. इशान किशन वगळता टीम इंडियाच्या इतर बॅटरना संघर्ष करावा लागला.
advertisement
1/7

इशान किशनने 40 बॉलमध्ये 192.50 च्या स्ट्राईक रेटने 77 रन केले, ज्यात 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. इशानशिवाय सूर्यकुमार यादवने 29 बॉल 32 आणि तिलक वर्माने 24 बॉल 25 रनची खेळी केली.
advertisement
2/7
शिवम दुबेने 17 बॉल 27 तर रिंकू सिंगने 4 बॉलमध्ये 11 रनची महत्त्वाची खेळी केली. अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा हे तिन्ही खेळाडू शून्य रनवर आऊट झाले. तर अभिषेक शर्माच्या शॉट सिलेक्शनवर टीकेची झोड उठली आहे.
advertisement
3/7
इशान किशनने इनिंगच्या दुसऱ्या बॉलला एक रन काढून अभिषेक शर्माला स्ट्राईक दिला. यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये अभिषेक शर्माला एकही रन काढता आली नाही, अखेर त्याने सलमान आघाचा चौथा बॉल पूल मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल मिड ऑनच्या दिशेने शाहिन आफ्रिदीच्या दिशेने गेला आणि त्याने कॅच पकडला.
advertisement
4/7
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी ही स्पिन बॉलिंगला मदत करणारी आहे, त्यामुळे बॉल थांबून येतो. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातला सामनाही याच मैदानात झाला होता, जिथे झिम्बाब्वेने पहिले बॅटिंग करताना फक्त एक सिक्स मारली होती.
advertisement
5/7
169 रन केल्यानंतर झिम्बाब्वेने फक्त 2 विकेट गमावल्या होत्या. एवढच नाही तर त्यांनी हा सामना 23 रननी जिंकून इतिहास घडवला. प्रेमदासाची खेळपट्टी कशी आहे हे झिम्बाब्वेचा सामना पाहून टीम इंडियाला माहिती झालं होतं, तरीही अभिषेक शर्माने त्याची शैली कायम ठेवली, ज्याचा फटका टीम इंडियाला बसला.
advertisement
6/7
अभिषेक शर्मानंतर हार्दिक पांड्यानेही तिच चूक केली. बॅटिंगला आल्यानंतर पहिल्याच बॉलला हार्दिक पांड्याने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण सॅम अयुबच्या बॉलिंगवर लॉन्ग ऑफवर उभ्या असलेल्या बाबर आझमने हार्दिकचा कॅच पकडला.
advertisement
7/7
अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपमध्ये 2 सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा शून्य रनवर आऊट झाला आहे. याआधी युएसएविरुद्धच्या सामन्यातही अभिषेक पहिल्याच बॉलला शून्य रनवर माघारी परतला. मागच्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये अभिषेक शर्मा 4 वेळा शून्य रनवर आऊट झाला आहे, यातल्या दोन वेळा तर तो पहिल्याच बॉलला पॅव्हेलियनमध्ये परतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Abhishek Sharma : झिम्बाब्वेकडून तरी शिकायचं होतं! हिरोगिरी करायला गेलेला अभिषेक कुठे चुकला?