TRENDING:

IND vs PAK सामना, पुन्हा तोच मुहूर्त, शोएब अख्तर आयुष्यात विसरणार नाही ती महाशिवरात्र!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवार 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या दोन्ही टीम कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांना भिडतील.
advertisement
1/8
IND vs PAK सामना... शोएब अख्तर आयुष्यात विसरणार नाही ती महाशिवरात्र!
पाकिस्तान सरकारने सुरूवातीला भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली, पण आयसीसीच्या दबावानंतर पाकिस्तानने यूटर्न घेत मॅच खेळणार असल्याचं जाहीर केलं.
advertisement
2/8
भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात 8 वेळा आमने-सामने आले आहेत, यातल्या 7 वेळा टीम इंडियाचा विजय झाला तर फक्त एकदाच पाकिस्तानने सामना जिंकला आहे. तर वनडे वर्ल्ड कपमध्ये 8 वेळा दोन्ही टीम समोरासमोर आल्या, या सर्व 8 सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला.
advertisement
3/8
15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला भारत-पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपचा सामना रंगणार आहे. याआधीही महाशिवरात्रीलाच भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपची लढत झाली होती. महाशिवरात्रीचा तो सामना पाकिस्तानी फास्ट बॉलर शोएब अख्तर कधीच विसरणार नाही.
advertisement
4/8
1 मार्च 2003 ला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगला. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानने सईद अन्वरच्या शतकाच्या जोरावर 273 रन केले.
advertisement
5/8
सेंच्युरियनच्या मैदानावर पाकिस्तानच्या आक्रमक बॉलिंगसमोर 274 रनचा पाठलाग करणं कठीण वाटत होतं, पण सचिन तेंडुलकर वसीम अक्रम, वकार युनूस आणि शोएब अख्तर या तिघांवर अक्षरश: तुटून पडला.
advertisement
6/8
सचिन तेंडुलकरने 75 बॉलमध्ये 130.66 च्या स्ट्राईक रेटने 98 रनची वादळी खेळी केली. पायातून गोळे येत असतानाही सचिनने झुंजार खेळी केली. सचिनचं शतक 2 रननी हुकलं असलं, तरी त्याच्या करिअरमधल्या सर्वोत्तम खेळीपैकी ही खेळी होती.
advertisement
7/8
सचिनने त्याच्या या खेळीमध्ये शोएब अख्तरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 रन ठोकल्या आणि क्रिकेट रसिकांच्या कायम लक्षात राहिल अशी सिक्सही मारली. शोएब अख्तरने त्याच्या 10 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन दिले.
advertisement
8/8
सचिनशिवाय युवराजने नाबाद 50, द्रविडने नाबाद 44 आणि कैफने 35 रनची खेळी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानवर 6 विकेटने विजय मिळवला. 1 मार्च 2003 ला महाशिवरात्रीला वर्ल्ड कपचा हा सामना झाला होता. आता 23 वर्षांनी 15 फेब्रुवारी 2026 ला पुन्हा एकदा महाशिवरात्रीलाच भारत-पाकिस्तान आमने-सामने असतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामना, पुन्हा तोच मुहूर्त, शोएब अख्तर आयुष्यात विसरणार नाही ती महाशिवरात्र!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल