TRENDING:

Team India : कॅच सोडले, बॅटिंगमध्ये गुडघे टेकले, विश्वास दाखवला त्याची प्लेइंग इलेव्हनमधून हकालपट्टी होणार!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो च्या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलिंग आणि फिल्डिंगने निराशाजनक कामगिरी केली आहे.
advertisement
1/8
कॅच सोडले, बॅटिंगमध्ये गुडघे टेकले, विश्वास दाखवला त्याची हकालपट्टी होणार!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 195/4 पर्यंत मजल मारली. भारताच्या खराब फिल्डिंगचा फायदाही वेस्ट इंडिजला झाला.
advertisement
2/8
या सामन्यात अभिषेक शर्माने 2 कॅच आणि तिलक वर्माने एक कॅच ड्रॉप केला. याशिवाय वरुण चक्रवर्तीने एक सोपा रन आऊट सोडला, तसंच वरुणने एक फोरही सोडली, ज्यामुळे बुमराहही मैदानात संतापला.
advertisement
3/8
मॅचच्या सुरूवातीलाच वरुण चक्रवर्तीने रोस्टन चेसचा रन आऊट वरुण चक्रवर्तीने सोडला. चेस आणि होप हे वेस्ट इंडिजचे दोन्ही ओपनर विकेटच्या मधोमध आले होते, पण वरुणने थ्रो करताना गोंधळ घातला आणि चेसला जीवनदान मिळालं. यानंतर 18व्या ओव्हरमध्ये बुमराहच्या बॉलिंगवर वरुणने फोर सोडली.
advertisement
4/8
वरुणने रन आऊट सोडल्यानंतर अभिषेकने रोस्टन चेसचा आणखी एक सोपा कॅच सोडला. पुढे इनिंगच्या 19व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला अभिषेकने रोव्हमन पॉवेलचा कॅच ड्रॉप करून त्यालाही जीवनदान दिलं.
advertisement
5/8
दोन कॅच सोडल्यानंतर बॅटिंगला आलेल्या अभिषेक शर्माच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. 11 बॉलमध्ये 10 रन करून अभिषेक आऊट झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 रन आलेल्या असतानाही अभिषेकने बेजबाबदार शॉट खेळला, ज्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली.
advertisement
6/8
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये अभिषेक शर्मा शून्य रनवर आऊट झाला होता, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अभिषेकने 12 बॉलमध्ये 15 रन केले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात मात्र अभिषेकने अर्धशतक झळकावलं, पण आता मोठ्या सामन्यात अभिषेक पुन्हा अपयशी ठरला.
advertisement
7/8
वेस्ट इंडिजच्या आधी पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यातही अभिषेकने गरज नसताना चुकीचा शॉट मारला होता. सलमान आघाच्या पहिल्या 3 बॉलला एकही रन काढता न आल्यामुळे अभिषेक सिक्स मारायला गेला आणि आऊट झाला.
advertisement
8/8
या वर्ल्ड कपमध्ये विरोधी टीमने अभिषेकच्या समोर स्पिन बॉलरचा वापर करून त्याला सापळ्यात अडकवलं. वेस्ट इंडिजनेही डावखुरा स्पिनर अकील हुसैनला बॉलिंग देऊन अभिषेकची विकेट घेतली. अभिषेकचा हा फॉर्म बघता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली तर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : कॅच सोडले, बॅटिंगमध्ये गुडघे टेकले, विश्वास दाखवला त्याची प्लेइंग इलेव्हनमधून हकालपट्टी होणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल