TRENDING:

T20 World Cup : कोलंबोमध्ये पाऊस, सेमी फायनलचं समीकरण फिरलं! पाकिस्तानवर डाव उलटला!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 स्टेजला सुरूवात झाली आहे. सुपर-8 मधला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
advertisement
1/7
कोलंबोमध्ये पाऊस, सेमी फायनलचं समीकरण फिरलं! पाकिस्तानवर डाव उलटला!
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातला सुपर-8 चा सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण टॉस सुरू होताच कोलंबोमध्ये पाऊस सुरू झाला.
advertisement
2/7
कोलंबोमध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडला प्रत्येकी 1-1 पॉईंट देण्यात आला आहे.
advertisement
3/7
न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे, कारण सुपर-8 मधला पाकिस्तानचा प्रेमदासा स्टेडियममधला हा शेवटचा सामना होता. उरलेले दोन्ही सामने पाकिस्तानला इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पल्लेकेले स्टेडियममध्ये खेळायचे आहेत.
advertisement
4/7
प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी ही स्पिन बॉलिंगला मदत करणारी आहे, ज्याचा फायदा पाकिस्तानने ग्रुप स्टेजमध्ये उचलला, पण पल्लेकेले स्टेडियमच्या पिचवर मोठा स्कोअर होतो. इंग्लंड-श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळपट्टीचा फटका पाकिस्तानला बसू शकतो.
advertisement
5/7
पावसामुळे सामना रद्द झाला आहे, त्यामुळे दोन्ही टीमचा नेट रनरेट हा शून्य राहिला आहे. आता उरलेल्या दोन सामन्यांमध्ये ज्याचा विजय मोठा असेल ती टीम नेट रनरेटच्या जोरावर पुढे जाईल.
advertisement
6/7
ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मधून प्रत्येकी 2-2 टीमच सेमी फायनलला जातील. त्यामुळे सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंडला त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावेच लागतील. या 2 पैकी एकाही सामन्यात पराभव झाला तर पाकिस्तान-न्यूझीलंडचं भवितव्य दुसऱ्या टीमवर अवलंबून राहिल.
advertisement
7/7
आता पाकिस्तान-न्यूझीलंडच्या उरलेल्या मॅच इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत. यातली एक जरी मॅच गमावली तरी त्यांचे जास्तीत जास्त 3 पॉईंट होतील. पण श्रीलंका-इंग्लंडने त्यांच्या 2-2 मॅच जिंकल्या तरी त्यांचे 4 पॉईंट्स होतात, त्यामुळे पाकिस्तान-न्यूझीलंडसाठी पुढचा रस्ता खडतर होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : कोलंबोमध्ये पाऊस, सेमी फायनलचं समीकरण फिरलं! पाकिस्तानवर डाव उलटला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल