कमावणारा एकटा-खाणारी तोंड पाच, डोक्यावर कर्जाचं ओझं, राजूने नको तो निर्णय घेतला, कुटुंब उघड्यावर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
वाशिम जिल्ह्यातील नवघरे येथील शेतकरी राजू कालापाड याने डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे टोकाचे पाऊल उचलले.
advertisement
1/5

किशोर गोमाशे, प्रतिनिधी, वाशिम : वाशिमच्या पांगरी नवघरे परिसरात शेतकऱ्यांनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/5
मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजु हरिभाऊ कालापाड या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
3/5
राजु कालापाड यांच्याकडे वडीलोपार्जित सहा एकर शेत जमीन असून दोघे भाऊ आहेत.
advertisement
4/5
राजु हा शेतीसोबतच मोल मजुरी करून परिवाराचा चरितार्थ चालवित होता.
advertisement
5/5
राजु कालापाड यांच्या आत्महत्येमुळे त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं असून पत्नी उषा कालापाड, पवन, अक्षर आणि पुनम या तीन मुलांचा आधार निघून गेला आहे. या घटनेचा पुढील तपास मालेगाव पोलिस करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
कमावणारा एकटा-खाणारी तोंड पाच, डोक्यावर कर्जाचं ओझं, राजूने नको तो निर्णय घेतला, कुटुंब उघड्यावर