Best Crime Thriller: रंगीबेरंगी फुलांखाली गाडलेली प्रेतं! क्षणाक्षणाला वाढतो सस्पेन्स, 6 एपिसोडची सीरिज पाहून उरात धडकी भरेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सध्या ओटीटीच्या जगात एका अशा सिरीजची चर्चा आहे, जी रिलीज होऊन १० महिने उलटले तरी आजही ट्रेंडिंगमध्ये आहे. हा थरार तुमच्या उरात धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
1/7

तुम्हाला जर वाटत असेल की बागेत काम करणारा माणूस फक्त झाडं-फुलांशी मैत्री करतो, तर 'नेटफ्लिक्स'वरील एक वेब सिरीज तुमचा हा समज मुळासकट उपटून टाकेल.
advertisement
2/7
सध्या ओटीटीच्या जगात एका अशा सिरीजची चर्चा आहे, जी रिलीज होऊन १० महिने उलटले तरी आजही ट्रेंडिंगमध्ये आहे. या सिरीजचं नाव आहे 'द गार्डनर'. अवघ्या ६ एपिसोड्सचा गुंफलेला हा थरार तुमच्या उरात धडकी भरवल्याशिवाय राहणार नाही.
advertisement
3/7
'द गार्डनर' ही एक स्पॅनिश रोमँटिक क्राईम थ्रिलर आहे. या मालिकेची कथा फिरते एका अशा माळीभोवती, जो लहानपणी एका भीषण अपघाताचा बळी ठरला होता. या अपघातामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच नष्ट झाले आहेत. तो हसत नाही, रडत नाही की चिडत नाही. पण सर्वात भयानक ट्विस्ट म्हणजे त्याची स्वतःची आई.
advertisement
4/7
आपलं हरवलेलं ऐश्वर्य आणि स्वप्नांचा महाल पुन्हा मिळवण्यासाठी ही आई आपल्या मुलाच्या या निर्विकारपणाचा गैरफायदा घेते. ती त्याला चक्क एक सुपारी घेणारा खुनी बनवते. ती लोकांकडून पैसे घेते आणि आपल्या मुलाकडून त्यांचे मर्डर करून घेते. मग हा मुलगा ती प्रेतं आपल्याच सुंदर बागेत फुलांच्या खाली दफन करतो.
advertisement
5/7
कथेला ट्विस्ट मिळतो जेव्हा या दगडी काळजाची माळी प्रेमात पडतो. त्याला एका मुलीवर प्रेम जडतं, पण दुर्दैव असं की, त्याच मुलीची सुपारी त्याच्या आईने त्याला दिलेली असते.
advertisement
6/7
ज्याला मारायचंय त्याच्याच प्रेमात पडल्यावर काय होतं? आईची डेथ ऑर्डर तो पाळणार की आपल्या प्रेमासाठी बंड करणार? या संघर्षात एक असं गुपित समोर येतं आणि आई आणि मुलगा दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते.
advertisement
7/7
अल्वारो रिको, कॅटालिना सोपेलाना आणि सेसिलिया सुआरेज यांच्या दमदार अभिनयाने सजलेली ही सिरीज गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रिलीज झाली होती, जी तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. मूळ स्पॅनिश असली तरी ही सिरीज हिंदीमध्येही उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Best Crime Thriller: रंगीबेरंगी फुलांखाली गाडलेली प्रेतं! क्षणाक्षणाला वाढतो सस्पेन्स, 6 एपिसोडची सीरिज पाहून उरात धडकी भरेल