T20 World Cup : आता चुकीला माफी नाही, 13 ब्लंडर झाली... आणखी एक अन् टीम इंडियाचा खेळ खल्लास!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून 13 घोडचुका झाल्या आहेत, पण आता सेमी फायनलमध्ये तशीच चूक झाली तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल.
advertisement
1/8

टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टिडियमवर संध्याकाळी 7 वाजता हा हाय व्होल्टेज सामना रंगेल. या सामन्यात विजय मिळवणारी टीम फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
2/8
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने ग्रुप स्टेजमधल्या 4 आणि सुपर-8 मध्ये 3 अशा एकूण 7 मॅच खेळल्या आहेत. यातल्या 6 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकमेव सामना भारताने गमावला.
advertisement
3/8
टीम इंडियाने या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक दिली असली तरी त्यांच्याकडून तब्बल 13 चुका झाल्या आहेत. आता सेमी फायनलमध्ये एक जरी चूक झाली तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं.
advertisement
4/8
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने 13 कॅच सोडले आहेत, या वर्षीच्या स्पर्धेत सर्वाधिक कॅच सोडणाऱ्या टीममध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ श्रीलंकेने 11, दक्षिण आफ्रिकेने 11, न्यूझीलंडने 9, पाकिस्तानने 8 वेस्ट इंडिज-झिम्बाब्वेने 7-7 आणि इंग्लंडने 6 कॅच सोडले.
advertisement
5/8
वेस्ट इंडिजविरुद्ध अभिषेक शर्मानेच 2 कॅच सोडले. यातला पहिला कॅच त्याने पाचव्या ओव्हरमध्ये रोस्टन चेससा सोडला. चेसने या सामन्यात 25 बॉलमध्ये 40 रन केले, त्यानंतर अभिषेकने 19व्या ओव्हरमध्ये रोव्हमन पॉवेलचाही कॅच सोडला.
advertisement
6/8
अभिषेकशिवाय तिलक वर्मानेही वेस्ट इंडिजविरुद्ध एक कॅच सोडला. शरफेन रदरफोर्डचा कॅच पकडत असताना तिलकचा अंदाज चुकला. बाऊंड्री लाईनवर उभं राहण्याच्या ऐवजी तिलक पुढे उभा राहिला आणि त्याच्या हातावरून बॉल गेला.
advertisement
7/8
पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यातही टीम इंडियाने चार कॅच ड्रॉप केले, यातही तिलक वर्माचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्ध वरुण चक्रवर्तीने एक सोपा रन आऊटही सोडला.
advertisement
8/8
टी. दिलीप हे सध्या भारतीय टीमचे फिल्डिंग कोच आहेत. सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला त्यांची फिल्डिंग सुधारावी लागणार आहे, या सामन्यात फिल्डिंगमध्ये एक जरी चूक झाली तरी टीम इंडियाच्या हातातून वर्ल्ड कपची ट्रॉफी निसटू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : आता चुकीला माफी नाही, 13 ब्लंडर झाली... आणखी एक अन् टीम इंडियाचा खेळ खल्लास!