TRENDING:

Mangal Nakshatra Gochar: वाईट बातमी! 20 मार्चपर्यंत 3 राशींना सावधानतेचा इशारा; मंगळाचा राहुच्या नक्षत्रात प्रवेश म्हणजे..

Last Updated:
Astrology : ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते. याच मंगळामुळे कुंडलीत मांगलिक दोष तयार होतो. 3 मार्चच्या रात्री हाच मंगळ ग्रह राहूच्या 'शतभिषा' नक्षत्रात गेला आहे. मंगळाचं हे नक्षत्र बदलणं काही राशींसाठी अडचणीचं ठरू शकतं. 20 मार्चपर्यंत मंगळ याच नक्षत्रात राहणार आहे. या काळात 3 राशींच्या लोकांनी फारच जपून राहणं गरजेचं आहे.
advertisement
1/5
वाईट बातमी! 20 मार्चपर्यंत 3 राशींना सावधानतेचा इशारा; मंगळ राहुच्या नक्षत्रात..
कर्क - मंगळाचा राहूच्या नक्षत्रात झालेला प्रवेश तुमच्या आयुष्यात कटकटी निर्माण करू शकतो. घरगुती बाबतीत तुम्हाला लय सावध राहावं लागेल. विवाहित लोकांनी जोडीदाराशी बोलताना शब्द तोलून-मापून वापरावेत, नाहीतर नात्यात दुरावा किंवा वेगळं होण्याची वेळ येऊ शकते. तब्येतीची पण काळजी घेणं गरजेचं आहे. जे लोक नेहमी नकारात्मक बोलतात, त्यांच्यापासून लांब राहा. उपाय म्हणून भगवान शिवाची पूजा करा.
advertisement
2/5
कन्या - शतभिषा नक्षत्रात मंगळाचं जाणं तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार घेऊन येऊ शकतं. ऑफिसमध्ये मोठ्या साहेबांशी किंवा वरिष्ठांशी खटके उडण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं शांत राहा. विनाकारण काळजी केल्यामुळे तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाईल.
advertisement
3/5
कन्या - आरोग्याच्या बाबतीत हा बदल फारसा चांगला नाही, तुम्हाला पोट आणि हृदयाची विशेष काळजी घ्यावी लागेल. उपाय म्हणून योगा आणि ध्यान करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.
advertisement
4/5
मीन - मंगळ नक्षत्रात बदलल्यामुळे तुमच्या उत्साहात कमी येऊ शकते. आळस तुमच्यावर ताबा मिळवेल, ज्यामुळे काही चांगली कामं बिघडू शकतात. करिअरमध्ये पाहिजे तसे रिझल्ट न मिळाल्याने थोडं नैराश्य येईल. पण अशा वेळी धीर सोडू नका आणि मेहनत सुरू ठेवा.
advertisement
5/5
मीन - घरच्या लोकांशी बोलताना विचार करून बोला, तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. उपाय म्हणून दररोज हनुमान चालीसा वाचा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Nakshatra Gochar: वाईट बातमी! 20 मार्चपर्यंत 3 राशींना सावधानतेचा इशारा; मंगळाचा राहुच्या नक्षत्रात प्रवेश म्हणजे..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल