TRENDING:

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना लाखोंचा गंडा, घेतली पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?

Last Updated:
Varsha Usgaonkar : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं.
advertisement
1/8
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना लाखोंचा गंडा, घेतली पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षा उसगांवकर यांना पोलिसांत धाव घ्यावी लागली आहे. वर्षा उसगांवकर यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/8
वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांची तब्बल 47 लाखांना फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि व्यावसायिक असलेल्या अविनाश जाधव यांनी ही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं आहे?
advertisement
3/8
अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांनी अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृणालिनी जांभळे या मराठी रंगभूमी तसंच सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत.
advertisement
4/8
संशयित आरोप अविनाश जाधव यांच्याशी तिची व्यावसायिक ओळख होती. त्याने तो निर्माता आणि बिल्डर असल्याचं सांगितलं होतं. त्याचा डोंबिवली येथे प्रोजेक्ट असून त्यात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देईन असं आश्वासन दिलं. वर्षभरात मूळ रक्कम परत देईल असंही सांगितलं.
advertisement
5/8
नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 मध्ये मृणालिनी आणि त्यांची मैत्रिण म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आणखी तीन जणांनी चेक आणि ऑनलाइ ट्रान्जॅक्सनद्वारे 47 लाख रुपयांची गुंतवणूक अविनाश जाधव यांच्याकडे केली.
advertisement
6/8
47 लाखांची गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातील अविनाश जाधव यांनी साडे चार लाख रुपयांचा परताना दिला मात्र त्यानंतर रिटर्न्स देणं बंद केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अभिनेत्रींनी अविनाश यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणतीही दाद दिली नाही. वेळोवेळी तो पत्ता आणि फोन नंबर बदलत राहिला.
advertisement
7/8
अविनाश जाधव यांच्याकडून कोणतीही दाद न मिळाल्यानं तक्रारदारांनी डोंबिवलीत जाऊन त्यांची भेट घेतली आणि पैशांबद्दल विचारलं. त्यावर मी पैसे देणार नाही, जे करायचं आहे ते करा अशा भाषेत उत्तर देण्यात आलं. अरेरावीची भाषा, उर्मट स्वर आणि धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्याच आलं आहे.
advertisement
8/8
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अभिनेत्रींनी 26 फेब्रुवारी रोजी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना लाखोंचा गंडा, घेतली पोलिसांत धाव, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल