TRENDING:

Pune Jobs: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 2500 तरुणांना मिळणार रोजगार, काय आहे 10 हजार कोटींचा मेगा प्लॅन?

Last Updated:

महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि हजारो तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारा एक महाकाय प्रकल्प पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर साकारला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि हजारो तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारा एक महाकाय प्रकल्प पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर साकारला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० हजार २१७ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, यामुळे तब्बल २,५०० थेट रोजगार निर्माण होणार आहेत.
2500 तरुणांना मिळणार रोजगार (प्रतिकात्मक फोटो)
2500 तरुणांना मिळणार रोजगार (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

२१०० मेगावॉटची वीज अन् रोजगाराची संधी

चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या माध्यमातून 'पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प' विकसित केला जाणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता २१०० मेगावॉट इतकी असेल. या प्रकल्पामुळे केवळ वीजपुरवठा स्थिर होणार नाही, तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

advertisement

सुमारे १०,२१७ कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक असलेला हा प्रकल्प पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम भागांच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अंदाजे २,५०० नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकासच नव्हे, तर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून या प्रकल्पामुळे राज्याच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होईल, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला मोठा वेग मिळणार आहे.

advertisement

महाराष्ट्राचं 'पॉवर' हब बनण्याचे स्वप्न

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

राज्यात सध्या अशा ५५ जलविद्युत प्रकल्पांचे नियोजन असून, त्यातून एकूण ७८,२१५ मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे. संपूर्ण राज्यात या माध्यमातून सुमारे ४.१७ लाख कोटींची गुंतवणूक आणि १.२८ लाख लोकांसाठी रोजगार निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. "ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी गुंतवणूक राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देईल," असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Jobs: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 2500 तरुणांना मिळणार रोजगार, काय आहे 10 हजार कोटींचा मेगा प्लॅन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल