'तू खेळ, मी कमावते...', कठीण काळात मराठी पत्नीची साथ, टीम इंडियाचा स्टार गाजवतोय वर्ल्ड कप!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
तू क्रिकेट खेळ, मी कमावते, असं म्हणत पत्नीने भारतीय क्रिकेटपटूला त्याच्या कठीण काळात पाठिंबा दिला. आज त्याच खेळाडूने टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कपमध्ये दणका उडवून दिला आहे.
advertisement
1/9

टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने सगळे 4 सामने जिंकले. भारताने युएसए, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव केला, याचसोबत भारताने सुपर-8 मध्येही प्रवेश केला आहे.
advertisement
2/9
सुपर-8 मध्ये टीम इंडियाचे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. सुपर-8 मध्ये सर्वाधिक पॉईंट्स मिळवणारी टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
3/9
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या झालेल्या 4 विजयांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान दिलं. सुपर-8 मध्ये मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती टीम इंडियाचा हुकमी एक्का ठरण्याची शक्यता आहे. वरुण चक्रवर्ती टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
advertisement
4/9
जगातला नंबर वन टी-20 बॉलर होण्यासाठी वरुणला बराच संघर्ष करावा लागला. या काळात वरुणला त्याची पत्नी नेहा खेडेकरने खंबीर पाठिंबा दिला. एसआरएम विद्यापीठामध्ये दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली, जिथे दोघं आर्किटेक्टचं शिक्षण घेत होते.
advertisement
5/9
2000 सालाच्या उत्तरार्धात कर्नाटकच्या बिदरचा रहिवासी असलेल्या वरुणने आर्किटेक्टचं शिक्षण घ्यायला सुरूवात केली, तिथेच त्याची आणि नेहा खेडेकरची भेट झाली. या भेटीचं रुपांतर नंतर मैत्री आणि मग प्रेमात झालं.
advertisement
6/9
वरुणने अभ्यासासाठी क्रिकेट सोडलं तेव्हाही नेहा वरुणमध्ये लपलेल्या क्रिकेटला प्रोत्साहन देत होती. पदवी पूर्ण केल्यानंतर वरुणला आर्किटेक्टची नोकरी मिळाली, पण क्रिकेट त्याच्या मनात कायम होतं.
advertisement
7/9
वरुण क्रिकेटसाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा विचार करत होता, तेव्हा नेहाने त्याला पूर्ण साथ दिली. 'क्रिकेट खेळ 5-6 हजार कमव, बाकीचे पैसे मी कमावते, आपण सांभाळून घेऊ, असं नेहा मला म्हणाली. माझ्याकडे काहीही नसताना तिने माझ्यावर विश्वास ठेवला', अशी भावुक प्रतिक्रिया वरुणने दिली आहे.
advertisement
8/9
नेहाच्या या विश्वासामुळे माझा आत्मविश्वास वाढला त्यानंतर तामिळनाडू प्रीमियर लीग 2018 मध्ये मी प्रकाशझोतात आलो. 2020 ला पंजाब किंग्सने मला विकत घेतलं आणि मग मी केकेआरकडे गेलो, नेहामुळे हे शक्य झालं, असं वरुण म्हणाला.
advertisement
9/9
2020 मध्ये वरुण आणि नेहाचं लग्न होणार होतं, पण कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं. अखेर 12 डिसेंबर 2020 ला दोघं विवाहबंधनात अडकले. 10 नोव्हेंबर 2022 ला या दोघांना मुलगा झाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'तू खेळ, मी कमावते...', कठीण काळात मराठी पत्नीची साथ, टीम इंडियाचा स्टार गाजवतोय वर्ल्ड कप!