IND vs NZ 2nd T20I : रायपूरमध्ये टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा 'वर्ल्ड रेकॉर्ड', 200 + चेस करताना असं कुणालाच जमलं नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Team India Create History Break Pakistan Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. यावेळी भारतीय टीमने टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला असून 200 पेक्षा जास्त रन्सचा पाठलाग करताना सर्वात मोठी कामगिरी केली आहे.
advertisement
1/7

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. यावेळी भारतीय टीमने टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला असून 200 पेक्षा जास्त रन्सचा पाठलाग करताना सर्वात मोठी कामगिरी केली आहे.
advertisement
2/7
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये भारताने 209 रन्सचे टार्गेट तब्बल 28 बॉल्स शिल्लक राखून पूर्ण केलं. असा पराक्रम करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. या विजयामुळे टीम इंडियाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
advertisement
3/7
या विक्रमी यादीत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी 2025 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 24 बॉल्स राखून 205 रन्सचे टार्गेट गाठले होते. तसेच, ऑस्ट्रेलियाने 2025 मध्येच वेस्ट इंडिजविरुद्ध 23 बॉल्स राखून विजय मिळवला होता.
advertisement
4/7
भारत आता 200 पेक्षा जास्त रन्सचे टार्गेट यशस्वीपणे पार करणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताने आतापर्यंत 6 वेळा हा कारनामा केला आहे, तर ऑस्ट्रेलिया 7 वेळा अशा विजयांसह पहिल्या स्थानावर आहे.
advertisement
5/7
भारताच्या या ऐतिहासिक प्रवासात अनेक महत्त्वाच्या मॅचेसचा समावेश आहे. टीम इंडियाने यापूर्वी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 रन्सचा यशस्वी पाठलाग केला होता. त्याआधी 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 208 रन्स, 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 207 रन्स केल्या होत्या.
advertisement
6/7
भारतीय बॉलर्सनी सुरुवातीला रन्स रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे न्यूझीलंडला 230 पर्यंत पोहोचण्यापासून रोखता आले आणि भारतासाठी विजयाचा मार्ग सोपा झाला. हर्षित राणाने यावेळी कमाल केली.
advertisement
7/7
दरम्यान, भारताकडून बॉलिंग करताना चायनामन कुलदीप यादवने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याला साथ देताना हार्दिक पंड्या, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली. तर कॅप्टन सूर्याला लागलेलं ग्रहण आता संपलं असून सूर्याने धमाकेदार अर्धशतकीय खेळी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ 2nd T20I : रायपूरमध्ये टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा 'वर्ल्ड रेकॉर्ड', 200 + चेस करताना असं कुणालाच जमलं नाही!