Weather Alert: थंडीची लाट की पाऊस? कल्याण-डोंबिवलीत शनिवारी कसं असेल हवामान?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाणे-मुंबईसह राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहे. शनिवारी कल्याण-डोंबिवलीतील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका काहीसा कमी होऊन किमान तापमानात वाढ होत आहे. विशेषतः मुंबईत सकाळी दाट धुके तर ठाणे जिल्ह्यात दमट हवामानामुळे उकाडा जाणवू शकतो. हिवाळ्याच्या अखेरीस तापमानात हळूहळू वाढ होऊन, पहाटे हलके धुके तर दुपारी उष्ण वातावरण अशी स्थिती आहे. 24 जानेवारी रोजी कल्याण-डोंबिवलीसह इतर भागातील हवामानाची काय स्थिती असेल? जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात शुक्रवारपेक्षा हवामानात बदल जाणवत आहेत. आकाश प्रामुख्याने निरभ्र आणि कोरडे राहील. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गुलाबी थंडी जाणवेल. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील.
advertisement
3/5
डोंबिवली शहरातील हवामान स्वच्छ, कोरडे आणि सुखद राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात हवामान स्थिर राहून कमाल तापमान 29-30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18-20 अंश सेल्सिअस राहील. सकाळी हलके धुके किंवा थंडी जाणवू शकते, मात्र दुपारनंतर उकडा जाणवेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान प्रामुख्याने कोरडे आणि आल्हाददायक राहील. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस असेल. दिवसा वातावरण अंशतः ढगाळ राहील, तर पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका जाणवू शकतो.
advertisement
5/5
बदलापूर शहरात हवामान अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर शहापूर मुरबाड तालुक्यातील हवामान स्थिर राहील. किमान तापमान 16 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: थंडीची लाट की पाऊस? कल्याण-डोंबिवलीत शनिवारी कसं असेल हवामान?